पुण्यात उद्यापासून गणेशोत्सव; डीजेच्या आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई !

पुण्यातला गणेशोत्सव (Pune Ganesh Fastival) शांततेत पार पाडणे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान असते.
Ganesh festival in pune
Ganesh festival in puneSarkarnama

पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला पुण्यात (Pune Ganesh Fastival) उद्यापासून मोठ्या उत्साहात सुरवात होत आहे. कोरोनातील दोन वर्षानंतर यावर्षी सर्वच मंडळांमध्ये उत्सवाचा मोठा उत्साह आहे. उत्सव साजरा करताना जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांनी डीजेच्या आवाजमर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिला आहे. (Pune Commissioner of police Amitabh Gupta)

Ganesh festival in pune
कल्याणशेट्टी यांच्या रूपाने अक्कलकोटला चौथ्यांदा मिळाली भाजप जिल्हाध्यक्षपदाची संधी

पुण्यातला गणेशोत्सव शांततेत पार पाडणे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान असते. राज्यात या काळात सर्वाधिक गर्दी पुण्यात होत असते. सुरक्षितता महत्वाची असते. उद्या गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. या पाश्‍र्वभूमीवर गुप्ता यांनी पोलीस यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला.उत्सवाचे दहा दिवस व त्यानंतर विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी सर्वाधिक कष्ट पोलिसांना घ्यावे लागतात. त्यादृष्टीने पुणे पोलिसांची संपूर्ण तयारी झाली आहे.

Ganesh festival in pune
Osmanabad : माजी खासदार गायकवाडही शिंदे सेनेत दाखल ; मुंबईत घेतली भेट..

गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेसाठी तब्बल साडेसात हजार पोलिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या गर्दीचे नियोजन आणि त्यांची सुरक्षितता तसेच विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आवश्‍यक नियोजन पोलिसांना करावे लागते. या साऱ्या तयारीचा आढावा पोलीस आयुक्त गुप्ता यांनी घेतला.

Ganesh festival in pune
बावनकुळेंच्या बारामती दौऱ्यावर फडणवीस म्हणाले, भाजपचं मिशन बारामती नसून...

श्रींच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी मंडळांकडून उद्या सकाळपासून मिरवणूक काढण्यात येतील. ही मिरवणूक तसेच विसर्जन मिरवणुकीत मंडळापुढे मिरवणुकी दरम्यान ढोलपथकाला बंधन नाही. मात्र, डीजेच्या आवाजावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ज्यांच्याकडून या नियमाचा भंग होईल, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले.

असा असेल बंदोबस्त

- पुणे पोलिसांच्यावतीने साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त.

- पुण्यात तीन हजार ६०० सार्वजनिक मंडळे.

- मंडळाकडून वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना.

- डीजेच्या आवाजाच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कारवाई.

- चोरी करणासाठी येणाऱ्या टोळ्यांवर लक्ष.

- नागरिकांना सोयीसाठी पुणे पोलीस दलाच्या ‘ट्विटर हॅण्डल’वर अपडेटची सोय.

- मेट्रोच्या खांबांची उंची २० फूट आहे त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला १८ फूट देखावे असावेत.

- कोथरूडकडून येणाऱ्या देखाव्यांची उंची १६ फूट असावी.

- वाहतुकीसाठी काही रोड बंद केले जातील. त्याची माहिती दिली जाणार.

- पीएमपीएल बसेससाठी देखील पर्यायी मार्ग दिलेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in