रश्‍मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी गजेरियाची माफी

गजारिया (gajeriya) यांच्या माफीनाम्यात त्यांनी ट्विट करताना भाषेच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे मान्य केले.
रश्‍मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी गजेरियाची माफी

Rashmi Uddhav Thackeray

Sarkarnama

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे (Ramshi Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्‌विट करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मीडिया सेलचे प्रभारी जितेन गजरिया यांनी माफी मागितली आहे. दरम्यान, गजरीया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांची आठ तास चौकशी केली.

<div class="paragraphs"><p>Rashmi Uddhav Thackeray</p></div>
अजितदादांना टक्कर देणाऱ्या कंदांना फडणवीसांचे भोजनाचे निमंत्रण!

गजारिया यांच्या माफीनाम्यात त्यांनी ट्विट करताना भाषेच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे मान्य केले.ही भाषा महिलांना आक्षेपार्ह आहे, त्यामुळे मी माफी मागतो. ही भाषा असभ्य आणि अपमानास्पद असल्यामुळे ट्विट डिलीट करत आहे आणि भविष्यात मी अशी भाषा वापरणार नाही, अशी कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Rashmi Uddhav Thackeray</p></div>
रामदेव बाबांना न्यायालयाचा दणका ; जुन्रर पोलिस करणार चौकशी

शिवसेनेचे शहर उपसंघटक उमेश वाघ (वय 53, रा. गोखलेनगर) यांनी प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली होती.शिवसेनचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या सुचनेनुसार, वाघ यांनी गुरुवारी दुपारी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात गजरियाविरुद्ध तक्रार दिली.गजरिया हा भाजपाच्या सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी आहे.

गजारिया यांनी ४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक ट्‌विट केले होते. गजरिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह ट्‌विट करुन ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केले होते. त्याचबरोबर त्याने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, कॉंग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांविरुद्ध बदनामीकारक मजकुर ट्‌विटरवर प्रसिद्ध केला होता.

केवळ नेत्यांवर टीका करून न थांबता जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीचे ट्‌विट केले आहे. गजरिया हा त्याच्या ट्‌विटमुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून द्वेष निर्माण करीत असल्याचे उमेश वाघ यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in