पुण्यातील गायकवाड पितापुत्राला मोका लावला पण अटक कधी होणार? 
Ganesh Gayakwad

पुण्यातील गायकवाड पितापुत्राला मोका लावला पण अटक कधी होणार? 

नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा गणेश याच्या कृत्याने उद्योगजगत व राजकारणात खळबळ माजवली आहे.

पुणे : केदार उर्फ गणेश गायकवाड व त्याचे वडील उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्यावर पिंपरी पोलिसांनी मोका कायद्यानुसार कारवाई केली खरी मात्र, विविध गुन्हे दाखल होत असताना हे दोन्ही पिता-पुत्र पोलिसांना सापडायला तयार नाहीत.या दोघांवर आता पुणे पोलीसदेखील मोका कायद्याखाली गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी हे दोघे पोलिसांच्या हाती कधी लागणार हा प्रश्‍न आहे.(Gaikwad father-son from Pune was charged MOCA but when will he be arrested?)  

दरम्यान, गणेश गायकवाड हा कॉंग्रेसचा पदाधिकारी होता. त्यास पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. गायकवाड पिता-पुत्रांसह पाच जणांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, खंडणी, पठाणी सावकारी, जागा बळकावणे अशा विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या केदार ऊर्फ गणेश नानासाहेब गायकवाड व त्याचे वडील उद्योजक नानासाहेब गायकवाड यांच्यावर मोकाची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या अनेक क्रुर कहाण्या जगासमोर येऊ लागल्या आहेत. 

 उद्योजक नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा गणेश गायकवाड याच्या कृत्याने उद्योगजगत व राजकारणात खळबळ माजवली आहे.अफाट पैसा व इस्टेट कमावून देखील मुलाला आमदार करण्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे अनेक दृष्कृत्ये तसेच क्रुरकहाण्या जगासमोर येऊ लागल्या आहेत. आध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुलच्या सांगण्यावरून सुनेचा आतोनात छळ करण्यात आला. तुमची सून औदसा असून पांढ-या पायाची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे. ती बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार होणार नाही. मंत्री होणार नाही. त्यामुळे तिला सोडचिठ्ठी दे.असा सल्ला आध्यात्मिक गुरू येमुल याने गायकवाड याला दिला होता.त्याच्या सांगण्यावर सुनेचा आतोनात छळ करण्यात आल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला असून त्यानंतर जमीन बळकावण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

 गायकवाडविरुद्ध गेल्या महिन्यात दरोड्याचा गुन्हा नोंद झालेला आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिकाच्या पिंपळे निलख येथील साईटवर जाऊन गणेश, त्याचे वडिल व साथीदारांनी काम बंद पाडले. तसेच पुन्हा इकडे फिरकला, तर दहावेळा फायरिंग करेन, असे  धमकावले होते. तर, त्याअगोदर पिंपरी-चिंचवडमधीलच हिंजवडी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध नऊ कोटी रुपयांची जमीन बळकावून फसवणूक केल्याचा गुन्हा जून महिन्यातच नोंदविण्यात आलेला आहे. तसेच पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची सूस (ता.मुळशी.जि.पुणे) येथील एक एकर जागा गायकवाडांनी बळकावून त्यांची फसवणूक केली गेली आहे. तसेच 20 लाख रुपयाच्या मुद्दलेबदल्यात 85 लाख रुपये व्याज्याच्या पैशापायी रायगड येथील 7 एकर जागा आणि पुण्यातील 4 गुंठे जागा बळजबरिने जमीन लाटण्यासाठी डोक्याला पिस्तूल लावून हवेत गोळीबार केला.
 

दरोडा, खंडणी, गोळीबार, अपहरणासह अवैध सावकारी व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल असूनदेखील गायकवाड पितापुत्र अद्याप मोकाट फिरत आहेत. गायकवाड कुटुंबिय व साथीदारांविरुद्ध एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही (चतुशृंगी पोलिस ठाणे) गुन्हे दाखल होऊनही गणेश व त्याचे वडील नानासाहेब यांना पकडण्यात पोलिसांना अपयश असल्याचे दिसून येत आहे. पुणे व पिंपरी शहरात आपल्यासारखे डॅशिंग पोलिस आयुक्त असूनही गायकवाड पितापूत्र फरार असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. गणेश व नानासाहेब आणि त्यांचे साथीदार तसेच नानासाहेबांची मुलगी सोनाली व जावई दीपक गवारे यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, खंडणी व दंगलीचा गुन्हा दाखल झाला. त्यात सोनाली व दीपक गवारे यांना अटक झाली. मात्र, गायकवाड पितापूत्र फरार राहिले. चतुशृंगींच्या सदर दोन गुन्ह्यांसह पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल तिन्ही गुन्ह्यातही गायकवाडांना दीड महिन्यानंतरही अटक झालेली नाही. 

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in