Pune G20 News: जी २० च्या प्रतिनिधींनी पुण्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेसह ऐतिहासीक वारसास्थळांना दिल्या भेटी

Pune G20: जी-२० प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसलाही भेट दिली.
ShaniwarWada G20
ShaniwarWada G20Sarkarnama

जी-२० परिषदेसाठी पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी आज पुणे विविध वारसास्थळांना भेट दिली. जी-२० परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींनी लालमहाल, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस आदी वारसास्थळांना बुधवारी भेट दिली. त्यानंतर शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे अचंबित झाले. तसेच लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून घेतला.

परदेशी पाहुण्यांची शनिवार वाड्यापासून या भेटीला सुरूवात झाली. शनिवार वाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. येथील इतिहासाविषयी उत्सुकतेने त्यांनी मार्गदर्शकांना काही प्रश्नही विचारले. परिसरातील जुने वडाचे झाड पाहण्यासाठी आवर्जुन काही क्षण त्यांनी त्याठिकाणी घालवले.

ShaniwarWada G20
Aurangabad Crime : एसीपी ढुमेंच्या विरोधात संताप, सीपी म्हणतात वाट बघावी लागेल..

यावेळी शनिवार वाडापाहून झाल्यानंतर नोंदवहीमध्ये शनिवार वाडा अत्यंत सुंदर, भव्य आणि आकर्षक असल्याची प्रतिक्रीया त्यांनी नोंदविली. अशा ऐतिहास स्थळांना भेट देण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिनिधींनी प्रशासनाला धन्यवादही दिले.

लाल महल येथे पारंपरिक चौघड्याच्या सुरावटीत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला. तर काहींनी महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी महालातील छायाचित्रेही त्यांनी आपल्या मोबाईमध्ये टिपली.

ShaniwarWada G20
Mangalwedha Politics : राष्ट्रवादीला खिंडार; भालके समर्थक विजयसिंह देशमुख भाजपच्या वळचणीला

अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला. अजित आपटे आणि संदीप गोडबोले यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली. तसेच महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, पर्यटन विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर, वारसा स्थळ जतन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्यासह आदी उपस्थित होते.

ShaniwarWada G20
Delhi Assembly News : आमदाराने विधानसभेत झळकवले लाचेच्या नोटांचे बंडल

तसेच यावेळी जी-२० प्रतिनिधींनी आगाखान पॅलेसलाही भेट देऊन महात्मा गांधीजी यांच्या जीवनाविषयी माहिती घेतली. यावळी त्यांनी गांधीजींचे बालपण, कस्तुरबा गांधींचे जीवन, आगाखान पॅलेस येथील गांधीजींचे वास्तव्य याबाबत माहिती विचारली. नीलम महाजन (Neelam Mahajan) यांनी त्यांना याबाबत तसेच पॅलेसचे ऐतिहासिक महत्व विषयी माहिती दिली. यावेळी पाहुण्यांनी चरखा बाबतही माहिती जाणून घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com