भाजपाप्रणित राज्यातच “मोदी मॉडेल”चा फज्जा : अनंत गाडगीळ

गुजरातचे "अकार्यक्षम मॉडेल"च आता देशापुढे उघड़ झाले आहे,
anant gadgil.jpg
anant gadgil.jpg

पुणे : २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने ज्या 'गुजरात मॉडेल' चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली. त्याच गुजरातमधे कोरोनाची दुसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल स्थानिक प्रसार माध्यमांनी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाड़े काढले. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खड़े बोल सुनावले. यामुळे, गुजरातचे "अकार्यक्षम मॉडेल"च आता देशापुढे उघड़ झाले आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.(The fuss of "Modi model" in BJP-led state: Anant Gadgil) 

उत्तर प्रदेशात एकीकडे एका मैदानात सामुदायिकरित्या शेकडो प्रेतांना अग्नि दिला जात असल्याची छायाचित्रेच परदेशी वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली तर दुसरीकडे पवित्र गंगेतून प्रेत वाहत असल्याची दृश्य सोशल मीडियावर वायरल झाली. उत्तर प्रदेश हे आता “नाथांचे नसून अनाथांचे राज्य” बनत चालले असल्याचे गाडगीळ यांनी उपरोधिकपणे म्हंटले आहे. गोव्यामधे ऑक्सिजनअभावी शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. "मुख्यमंत्र्यांवर विश्‍वजीत राणेंची आगपाखड़" हे महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यात भाजपमधील दररोजचे चित्र आहे असा टोमणाही गाडगीळ यांनी लगावला आहे. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बेंगलुरु शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या “कोरोना-मृतांसाठी राखीव” ठेवाव्या लागल्या आहेत.

गेल्या महिन्याभरातील वरील राज्यांअंतर्गत परिस्थितीच्या सर्वेक्षणानंतर भाजपाची सरकारे असलेल्या राज्यातच "मोदी मॉडेलचा फज्जा” उडाला असल्याची टीका गाडगीळ यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार यशस्वी होत असून लसीकरणाचे काम येत्या काही महिन्यात अधिक होईल, असा विश्‍वास गाडगीळ यांनी व्यक्त केला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com