भरणेमामांनी शब्द पाळला; लाकडी निंबोडी योजनेस अखेर मंजुरी

मंत्रिपदाच्या शपथेनंतर जेवढा आनंद झाला नाही त्यापेक्षा जास्त आज झाला...
Minister Dattatray Bharane-Ajit Pawar-Indapur-pune News
Minister Dattatray Bharane-Ajit Pawar-Indapur-pune NewsSarkarnama

शेटफळगढे : गेल्या २५ वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या इंदापूर (Indapur) तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या ३४८ कोटी ११ लाख रुपयाच्या अंदाजपत्रकास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्या विशेष प्रयत्नातून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जलसंपदा विभागाने याबाबतच्या मान्यतेचा आज (ता.12 मे) अधिकृत शासन निर्णयही काढला. या योजनेद्वारे इंदापूर व बारामती या दोन्ही तालुक्यातील १७ गावातील ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. (Minister Dattatray Bharane-Ajit Pawar-Indapur-pune Marathi News)

Minister Dattatray Bharane-Ajit Pawar-Indapur-pune News
केंद्र अपयशी, महाराष्ट्र मात्र भारनियमनमुक्त राज्य!

१९९५ पासून आजवरच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत विशेष करून इंदापूर तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या योजनेची चर्चा झाली. मात्र प्रत्यक्षात या योजनेस मान्यता मिळाली नाही.

अखेरीस भरणे यांनी ३० डिसेंबर २०१९ ला मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ही योजना मार्गी लावण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी भरणेंनी स्वतः पाठपुरावा केला. यासाठी अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व अधिकाऱ्यांसमवेत अडीच वर्षात जवळपास दहा बैठका घेतल्या. व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतः मंत्री असूनही मंत्रालय स्तरावर स्वतः पाठपुरावा केला. यामुळे प्रत्यक्षात भरणे यांच्या पाठपुराव्यामुळे इंदापूर तालुक्यातील जरास भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या योजनेच्या माध्यमातून सिंचनाखाली येणारे तालुकानिहाय व गावनिहाय क्षेत्र (हेक्टर मध्ये )

इंदापूर तालुका- लामजेवाडी (२३८,१), शेटफळगढे (१३८,८) , म्हसोबाचीवाडी ((७५६.६), निरगुडे (६६५.२ ) लाकडी (७४०.७), निंबोडी (४५५.५) शिंदेवाडी (५४३.८) काझड (५१३.७) वायसेवाडी (१६२.६) धायगुडेवाडी अकोले (१२२.७) एकूण ४ हजार ३३८ हेक्टर

बारामती तालुका - कटफळ (७४४.८) सावळ (९०४.९) जैनकवाडी (४७७.७) पारवडी (२०८.८) कनेरी (२५७.८) काटेवाडी (२१६.१) गाडीखेल (१०२.४)

एकूण २ हजार ९१३ हेक्टर, इंदापूर व बारामती तालुका एकूण सिंचनाखाली येणारे क्षेत्र ७ हजार २५० हेक्टर

  • १. योजनेचे स्वरुप- या योजनेसाठी उद्भव उजनी धरणाच्या जलाशयातून मौजे कुंभारगाव येथून पाणी उचलण्यात येणार आहे. याकरिता ०.९० अब्ज घनफूट (२५.४८४ दलघमी) पाण्याची तरतूद करण्यात आली आहे.

  • २. या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये ५०.१० मीटर व दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुक्रमे ५१.२० मिटर व ७३.२० मीटर शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून बंदिस्त नलिका का प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला दिले जाणार आहे.

  • ३. कुंभारगाव येथे योजनेचे पहिले तर शेटफळगडे येथे योजनेचे दुसरे पंपगृह केले जाणार आहे कुंभर्रगाव येथे ७६५ अश्‍वशक्तीचे ४ तर शेटफळगढे येथे ५४० अश्‍वशक्तीचे २ तर ६४० अश्वशक्तीचे ३ विद्युत पंप बसविण्यात येणार आहेत.

  • ४. लामजेवाडी येथे योजनेचे पहिले वितरण कुंड व जैनकवाडी येथे योजनेचे दुसरे वितरण कुंड बांधले जाणार आहे.

  • ५. व यातून बंदिस्त नलिका वितरण प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला पाणी दिले जाणार आहे.

Minister Dattatray Bharane-Ajit Pawar-Indapur-pune News
नानांचे अजितदादांना तिखट उत्तर : जयंत पाटलांनी सही केलेले पत्रच दाखवले!

दरम्यान, "मला मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर जेवढा आनंद झाला नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीने ज्यादा आनंद आज या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने झाला आहे. गेल्या २५ वर्षापासून प्रलंबित असलेली ही योजना मार्गी लागल्याने गोरगरीब जिरायत शेतकऱ्यांचे शेती सिंचनाचे स्वप्न यामुळे पूर्ण होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह संपूर्ण राज्य सरकारचे मी शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. लवकरच केंद्रीय माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, यांच्या उपस्थितीत या योजनेचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे भरणे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com