इंधन दरवाढीवरून भाजप, राष्ट्रवादीमध्ये तू-तू मैं-मैं..

केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देत असल्याचा आरोप केला होता.
Ajit Gavhane, Mahesh Landge
Ajit Gavhane, Mahesh Landgesarkarnama

पिंपरी : इंधनाचे दर कमी करण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार व त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात कोरोना आढावा बैठकीच्या निमित्ताने नुकतीच 'तू,तू,मैं,मैं' झाली. या वादात गुरुवारी (ता.२८) भोसरीचे पैलवान आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge)यांनी उडी घेतली.

केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देत असल्याचा आरोप केला होता. त्यातून जनतेची राज्य सरकार लूट करीत आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला होता.त्याचा खरपूस समाचार शिवसेना नाही,तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांनी लगेच आज (ता.२९)घेतला.मात्र, मोदींनी ठाकरेंना लक्ष्य करूनही शिवसेनेचे स्थानिक नेते गप्प असल्याबद्दल मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Ajit Gavhane, Mahesh Landge
शिवसेना खासदार भावना गवळी पुन्हा अडचणीत ; ईडीकडून समन्स, हजर राहण्याचा आदेश

केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलवर तीनशे टक्के आयात शुल्क (एक्साईज ड्युटी) वाढविण्यात आले. यातून केंद्र सरकारने तब्बल २७ लाख कोटींची नफेखोरी केल्यानंतरही मुग गिळून गप्प बसलेल्या आमदार लांडगेंना पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची आठवण होणे हास्यास्पद आहे. राज्यातील जनतेचा एवढाच कळवळा असेल, तर केंद्राकडे राज्याचे जीएसटीपोटी अडकलेले 26 हजार कोटी रुपये आणण्यासाठी प्रयत्न करावेत,असा सणसणीत टोला गव्हाणे यांनी लगावला.

Ajit Gavhane, Mahesh Landge
Maharashtra : सभांचा धडाका ; मुख्यमंत्री , फडणवीस, राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

राज्य सरकारने व्हॅटमध्ये कपात न केल्याने राज्यातील जनतेची लूट सुरू असल्याचे सांगणाऱ्या लांडगेंचा हा जावईशोध असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यापेक्षा केंद्राकडून इंधन दरवाढीतून जनतेची लूट कशी सुरु आहे,हे सांगताना ते म्हणाले, केंद्रात भाजपची सत्ता आली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलवर आयात शुल्क हे प्रतिलिटर 9 रुपये 48 पैसे होते. मात्र भाजप सरकारने गेल्या सात वर्षांत त्यामध्ये 300 टक्के वाढ केल्याने केंद्र त्यातून प्रति लिटर 32 रुपये 90 पैसे कमवित आहे.

इतर करांचा बोजाही केंद्राने पेट्रोल व डिझेलवर लादला आहे.पेट्रोल डिझेलच नव्हे, तर जीएसटीमध्येही केंद्र सरकारने भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती गॅसचा भाव 1 हजाराच्या पुढे गेला.सर्वसमान्य जनतेला महागाईच्या गर्तेत लोटले जात असताना हेच आमदार महाशय तोंडावर बोट ठेवून गप्प होते. मात्र, त्यांना आता अचानक राज्य सरकार व्हॅटच्या माध्यमातून जनतेची लूट करत असल्याचा साक्षात्कार झाला. व्हॅटचा दर हा महाराष्ट्रात भाजप सरकार असताना लावण्यात आला आहे. त्यावेळीही लांडगे हे आमदार होते मात्र त्यांना व्हॅटची तेव्हा आठवण झाली नाही. आता केवळ राजकारणातून स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी त्याची आठवण झाल्याचेही गव्हाणे म्हणाले.

जनतेचा एवढाच कळवळा असेल तर तीनशे टक्के आयात शुल्क वाढविणाऱ्या आपल्या केंद्र सरकारला जाब विचारण्याचे धाडस लांडगे दाखवतील काय? असे आव्हान गव्हाणे यांनी दिले आहे.जीएसटीच्या पैशांसाठी ते पत्रक कधी काढणार? अशी विचारणाही त्यांनी केली.त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात आतापर्यंत केवळ राजकीय स्वार्थासाठी जुमलेबाजी आणि पत्रकाबाजी केली आहे. जनतेशी काहीही देणेघेणे नसलेल्या या आमदारांनी भोसरीच्या व्हिजनचे जे गाजर दाखविले होते त्याचे काय झाले अशी विचारणा त्यांनी केली.

राज्यातील जनतेला दिलासा देण्याच्या हेतूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएनजीच्या दरात तब्बल 7 रुपयांची घट केली होती. व्हॅटमध्ये दहा टक्के कपात केल्यामुळे ही दरकपात झाली होती. मात्र त्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच केंद्र सरकारने तब्बल 9 रुपयांची सीएनजीची दरवाढ केली.त्यावर लांडगे हे मूग गिळून गप्प का? सीएनजी दरवाढीबाबत बोलण्याचे धाडस ते दाखविणार का? असा प्रश्नही गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com