धक्कादायक! भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक: पुण्यात गुन्हा दाखल

Crime news Pune| आई आजारी असल्याचं कारण देत संबंधित तरुणाने आमदारांकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती
धक्कादायक! भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक: पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : राज्यातील ४ महिला आमदारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. (Crime news in Pune)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोड नावाच्या तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आमदारांनीही मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

धक्कादायक! भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक: पुण्यात गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातही शिवसेनेला सुरुंग: सामूहिक राजीनामे देणार

मुकेश राठोड याने आई आजारी असल्याचं कारण देत संबंधित आमदारांकडे आर्थिक मदतीची मागणी केली. मेडिकल आणि हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत त्यांने मतदतीची मागणी केली होती. त्यानुसार आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांनी त्याला ऑनलाईन माध्यमातून आर्थिक मदतही केली. पण नंतर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com