Baramati news: धक्कादायक: दोन कुटूंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का...

या घटनेमुळे संपूर्ण बारामतीत शोककळा पसरली आहे
Baramati news:
Baramati news: Sarkarnama

Baramati News: बारामती तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. खांडज येथे जनावरांच्या मलमूत्र साठवण टाकीत पडून दोन कुटूंबातील चौघा जणांचा मृत्यू झाला. टाकीत पडून गुदमरलेल्या त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी परिसरात चर्चा आहे. आटोळे कुटुंबीयातील तिघे,तर गव्हाणे कुटुंबीयांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे.

मृत्युमुखी पडलेल्यामध्ये भानुदास अंबादास आटोळे (वय ६०) , प्रवीण भानुदास आटोळे( वय ३२), प्रकाश सोपान आटोळे(वय ५५) आणि बाबा पिराजी गव्हाणे(वय ३८) यांचा समावेश आहे. मयत भानुदास व प्रवीण हे पिता पुत्र आहेत.या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी आणले रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Baramati news:
Uddhav Thackeray : मी घरी बसून जे केलं, ते सूरत-गुवाहाटीला जाऊन तुम्हाला जमलं नाही; ठाकरेंचा शिंदेना टोला

नातेवाईकांसह अनेकांनी बारामती शहरातील सिल्वर जुबली हॉस्पिटल कडे धाव घेत गर्दी केली. माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने प्राप्त स्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.बारामती तालुक्यात खांडज गावामध्ये शेतकरी आटोळे कुटुंबातील तिघांचा तसेच एका गव्हाणे कुटुंबीयातील एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती पुढे येताच खांडज गावासह बारामती तालुक्यात शोककळा पसरली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस महसूल आणि आरोग्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना मदत करणे तसेच घटनास्थळी भेट देणे अधिक कार्य हाती घेतल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in