Pune News : धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन: कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

मुळ अमरावतीचे राहणारे थोटे कुटुंबीय दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात राहायला आले होते.
Pune News
Pune News

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढवा परिसरातील एका कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे चौघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. दीपक पुंडलिक थोटे (वय ५९), इंदू दीपक थोटे (वय ४५), ऋषिकेश दीपक थोटे (वय २४), समीक्षा दीपक थोटे (वय १६) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंढव्यातील केशवनगर परिसरातील शुक्रवारी (१३ जानेवारी) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मुळ अमरावतीचे राहणारे थोटे कुटुंबीय दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात राहायला आले होते. केशवनगरमध्ये त्यांनी भाडेतत्वावर फ्लॅट घेतला होता. दीपक थोटे यांनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात नुकसान झाल्याने थोटे पती-पत्नी तणावाखाली होते. त्यांची आर्थिक परिस्थितीतीही खालावली होती.

Pune News
Sanyukta Maharashtra : शिंदे सरकार सीमाप्रश्नी गंभीर नाही : महाराष्ट्र एकीकरण समिती उचलणार मोठे पाऊल

या तणावात दीपक यांनी पत्नी इंदू मुलगा ऋषिकेश, मुलगी समीक्षा यांच्यासह विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली. थोटे यांच्या फ्लॅट गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याचा संशय त्यांचे शेजारी डॉ. दौलत पोटे यांना आला. त्यांनी पोलिसांना ही गोष्ट कळवलीमुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार लकडे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेत थोटे यांच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला, पण आतून काहीच प्रतिसाद न आल्याने शेवटी त्यांनी दरवाजा तोडला आणि ही बाब समोर आली. त्यानंतर चौघांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com