माजी गृहमंत्री वळसे पाटलांच्या पुतण्याचा पत्ता कट; हिंगे, दरेकर, निकम, गिरेंच्या पदरी निराशा

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार गट महिलांसाठी राखीव
Vivek Walse Patil
Vivek Walse PatilSarkarnama

पारगाव (जि. पुणे) : आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील पाच जिल्हा परिषद (ZP Group) गटांच्या आरक्षण सोडतीत सर्वच गटांचे पूर्वीचे आरक्षण बदलले असून अवसरी बुद्रुक-पिंपळगाव जिल्हा परिषद गटात अनुसूचित जमाती पुरुष वगळता इतर सर्व ठिकाणी महिला आरक्षण आल्याने महिला राज येणार आहे. एकाही ठिकाणी सर्वसाधारण पुरुष आरक्षण नसल्याने सर्वच राजकीय पक्षातील सर्वसाधारण गटातील पुरुष इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. पाचपैकी चार विद्यमान सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. यामध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे पुतणे विवेक वळसे पाटलांचा (Vivek Walse Patil) पत्ता कट झाला आहे. सर्वसाधारण गटातील पुरुषांचा मात्र पुरता भ्रमनिरास झाला आहे. शिनोली-बोरघर गटातील विद्यमान सदस्या रुपाली जगदाळे यांचा गट सर्वसाधारण महिला आल्याने पुन्हा संधीची आशा आहे. शिनोली-बोरघर, घोडेगाव-पेठ व पारगाव-जारकरवाडी तीनही सर्वसाधारण महिला राखीव, तर अवसरी बुद्रुक-पिंपळगाव अनुसूचित जमाती सर्वसाधारण व कळंब-चांडोली बुद्रुक अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण आले आहे. (Four groups of Zilla Parishad in Ambegaon are reserved for women)

अवसरी बुद्रुक-पिंपळगाव तर्फे महाळुंगे जिल्हा परिषद गटाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती पुरुष आले असून सर्वच राजकीय पक्षांना उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. या गटात प्रबळ इच्छुक असलेल्या उपसभापती संतोष भोर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, युवासेना राज्य विस्तारक सचिन बांगर, निलेश टेमकर, नीलेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, मथाजी पोखरकर यांची निराशा झाली आहे. या गटात अगोदर सर्वसाधारण महिला आरक्षण होते. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या राष्ट्रवादीच्या अरुणा थोरात आहे. या वेळी मात्र सर्वच राजकीय पक्षांना उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या गटातील आयात उमेदवार लादल्यास मतदार मतपेटीतून नाराजी दाखवण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

Vivek Walse Patil
संजयमामांची राष्ट्रवादीवर निष्ठा कायम; मात्र महेश कोठेंचे ‘साहेब’ अजूनही ठरेनात?

शिनोली-बोरघर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला असून या अगोदर येथे ओबीसी महिला राखीव होते. येथील विद्यमान जिल्हा परिषद सदस्या राष्ट्रवादरच्या रुपाली जगदाळे या आहेत. आंबेगाव (घोडेगाव)-पेठ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला झाले असून यापूर्वी येथे सर्वसाधारण आरक्षण होते. येथील विद्यमान सदस्य शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर आहेत. या गटात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे लांडेवाडी गाव येत असल्याने या गटावर शिवसेनेचे नेहमी वर्चस्व राहिले आहे.

Vivek Walse Patil
अजितदादांनी फडणवीसांना सुनावले; ‘पाच अन्‌ सात काय करता?, मदतीचे बोला...’

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या घरचा जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जाणारा पारगाव-जारकरवाडी गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघालेआहे. या पूर्वी हा गट खुला होता. येथील विद्यमान सदस्य हे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील हे आहेत. या गटात शिवसेनेचे रमेशकुमार हिंगे हा एक अपवाद वगळता आत्तापर्यंत राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. आरक्षण सर्वसाधारण महिला राखीव आल्याने उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे वळसे पाटील कुटुंबातीलच उमेदवाराचे नाव पुढे येऊ शकते, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. पोंदेवाडीच्या नीलम अनिल वाळुंज व शिवव्याख्यात्या अर्चना करंडे यांचेही नावे सोशल मीडियातून चर्चेत आली आहेत.

Vivek Walse Patil
'काही लोकांची तुमच्यावर नजर आहे, सावध रहा; नवनीत राणांना धोक्याची सूचना देणारे पत्र

शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनीही या गटातून प्रतिनिधित्व केलेले आहे. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले या गटातील असून तीन चार गावांवर शिवसेनेचा प्रभाव आहे, त्यामुळे शिवसेनेची महिला उमेदवार कोण असणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला राखीव झाले आहे. यापूर्वी येथे सर्वसाधारण महिला राखीव होते. येथील विद्यमान जिल्हा परिषद सदस्या राष्ट्रवादीच्या तुलसी भोर या आहेत. या गटात मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रभावी उमेदवार म्हणून जोरदार चर्चा होती. त्याचबरोबर उषा कानडे, रमेश कानडे, प्रमोद कानडे, सचिन भोर, शिवसेनेचे प्रवीण थोरात यांच्या नावाचीही चर्चा होती. पण, या ठिकाणी अनुसूचित जमाती महिला राखीव आल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. दोन्ही पक्षाला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार : वळसे पाटील

जिल्हा परिषद गटांचे आरक्षण कोणतेही आले असले तरी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील सर्वच गटात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत, त्यामुळे प्रत्येक गटात राष्ट्रवादीचे आरक्षणानुसार सक्षम उमेदवार आहेत. आगामी निवडणुकातही सर्वच गटात राष्ट्रवादीचा प्रभाव राहणार आहे, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

आढळरावांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम उमेदवार देणार : गिरे

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेचे युती सरकार आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच गटात सक्षम उमेदवार दिले जातील. मतदारांचा आम्हाला जोरदार पाठिंबा मिळेल, असा दावा शिंदे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी दावा केला आहे.

आघाडीबाबत पक्षाचा आदेश पाळू : भोर

सर्व गटात शिवसेना स्वबळावर लढणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहे, त्यामुळे मतदारांचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल. आघाडीबाबत पक्ष जो आदेश देईल, त्याचेही पालन केले जाईल, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर यांनी सांगितले.

युती की स्वबळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार : डॉ कराळे

राज्यात भाजप-शिवसेनेचे युती सरकार असल्याने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार युतीमध्ये निवडणुका लढवायच्या की स्वबळावर याचा निणर्य घेतला जाईल, त्याप्रमाणे उमेदवार उभे केले जातील, असे भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com