Bhor News : भोर हादरलं : विजेचा शॉक लागून पितापुत्रासह चौघांचा मृत्यू

विजेचा धक्का बसून एकाच गावातील चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकाच घरातील तिघांचा समावेश आहे.
Bhor News
Bhor NewsSarkarnama

भोर (जि. पुणे) : पुणे (Pune)-सातारा (Satara) महामार्गावरील भोर (Bhor) तालुक्यातील निगडे येथे नदी पात्रात मोटार टाकत असताना विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये एकाचा घरातील पितापुत्रासह तिघांचा समावेश आहे. ही दुर्घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. मृत्युमुखी पडलेले चारजण निगडे गावाचे रहिवाशी आहेत. (Four died due to electric shock in Bhor taluka)

Bhor News
Latur News: दुर्दैवी - पत्नीच्या प्रचाराचे भाषण संपवून खुर्चीत बसले आणि मृत्यूने गाठले

विठ्ठल सुदाम मालुसरे (वय ४५), सनी विठ्ठल मालुसरे (वय २६), अमोल चंद्रकांत मालुसरे (वय ३६) आणि आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय ५५, सर्वजण रा निगडे, ता. भोर, जि. पुणे) अशी मृत्युमुखी पडलेल्या चौघांची नावे आहेत.

Bhor News
Gram Panchayat Election : पालकमंत्र्यांसह भाजपचे बडे नेते उतरले बाराशे मतदारांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात!

सनी व विठ्ठल मालुसरे या पितापुत्राचा आणि भावकीतील अमोल मालुसरे तर गावातील आनंदा जाधव या चौघांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे निगडे गावावर शोककळा पसरली आहे.

Bhor News
Grampanchayat election : कोण आला रे कोण आला...गुवाहाटीचा चोर आला....कुमठेत भाजप, राष्ट्रवादीत राडा...

गुंजवणी नदीच्या पाण्यात निगडे गावच्या हद्दीत असलेल्या बंधाऱ्याच्या बॅक वॉटरमध्ये विठ्ठल मालुसरे यांचा वीजपंप बसविण्यात येत होता. विजेचा पंप घेऊन ते चौघेजणही पाण्यात उतरले होते. विजपंप ते पाण्यात ढकलत होते, त्यावेळी पाण्यात विजेचा प्रवाह आल्यामुळे चौघांचाही विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही गोष्ट शेजारच्या शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांच्या ध्यानात आली. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर विजेचा प्रवाह बंद केला गेला.

Bhor News
शिंदे गट व ठाकरे गट व्यासपीठावर एकत्र येणार ? कोकणात मुख्यमंत्र्यांसमोरच मुकाबला रंगणार ?

या दुर्घटनेची माहिती मिळताच महावितरणचे भोरचे उपअभियंता संतोष चव्हाण, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, आमदार संग्राम थोपटे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, कुलदीप कोंडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पंचनाम्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com