मंत्री सावंतांचे चार वाद...खेकडा, हाफकिन, डास, आणि आता खाज...

Tanaji Sawant : मंत्री तानाजी सावंत यांना मराठा समाजाची माफी मागावी लागली आहे.
 Tanaji Sawant Latest News
Tanaji Sawant Latest NewsSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वादाची मालिका त्यांचा पाठलाग सोडताना काही दिसत नाही. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून ते सातत्याने विरोधकांचे टार्गेट बनत आहेत. काल (ता.२५ सप्टेंबर) उस्मानाबाद येथे भाषणादरम्यान त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जोशात बोलत वादग्रस्त वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. यामुळे त्यांना मराठा समाजाची माफी मागण्याची वेळ आली.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून सावंत आणि वादग्रस्त वक्तव्यावरून वाद हे जणू समीकरणंच झालं आहे. फडणवीस सरकारमध्ये जलसंधारण मंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरण फुटीबाबत आपलं मत व्यक्त करतांना त्यांनी खेकड्यांचा केलेला उल्लेख, पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात पकडण्यात आलेले डासांची संख्येवरून विरोधकांनी उडवलेली त्यांची खिल्ली, त्यानंतर पुण्यातील ससून रुग्ण्यालयात ‘हाफकीन’ (Hafkin) या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांची चांगलीच फजिती झाली आहे. त्यामुळे सावंतांना जरा जपून, अशी म्हणायची वेळ मुख्यमंत्री शिंदेंवर आली असणार, असं म्हटल्यास काही वावंग ठरणार नाही.(Tanaji Sawant Latest News)

 Tanaji Sawant Latest News
जितेंद्र आव्हाडांनी फडणवीसांची भेट का घेतली?; चर्चेला उधाण...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत चाळीस आमदारांनीही बंड केलं त्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंता हे आघाडीवर होते. बंडखोरीनंतर सावंतांनी सातत्याने 'मातोश्री' आणि ठाकरे परिवारावर कठोर शब्द टीका केली आहे. त्यामुळे त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दरम्यानच्या काळात त्यांच्या पुण्यातील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला देखील केला होता. मात्र, सावंतांनी यानंतरही आपली वक्तव्य काही बंद केली नाही. याचाच फटका त्यांना बसतोय, असे त्यांच्या कालच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावरून दिसत आहे.

 Tanaji Sawant Latest News
शिवसेनेला रोज संजय राऊत यांची आठवण... तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेत्याची वाणवा

उस्मानाबाद येथे हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रे दरम्यान बोलताना मराठा समाजाला आरक्षणाची खाज असं वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं. यामुळे त्यांना माफी मागावी लागली आहे. मात्र मराठा समाज आणि विरोधकाकडून त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला जात आहे. मात्र, सावंत यांचा हा पहिलाच वाद नसून याआधीही त्यांनी तिवरे धरण फुटल्यावर ते खेकड्यांमुळे फुटलं असाव, असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळीही त्यांना विरोधकांच्या आणि सोशल मीडियावर टिकेच धनी व्हावं लागलं होतं. तर आरोग्य मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर हाफकीन नावाच्या व्यक्तीकडून औषधी घेऊ नका,असं वक्तव्यही त्यांच्या चांगलंच अंगलट आलं होतं.

 Tanaji Sawant Latest News
बाळासाहेबांचा लाडका चंपासिंह थापाही शिंदेंच्या गळाला...

त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनात पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे सावंत यांना देता न आल्याने प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. यावेळी किती डास पकडण्यात आली त्यातील मादी आणि नर किती यावरूनही त्यांची विरोधकांनी खिल्ली उडवली होती. तर पुण्यात ससून रुग्ण्यालयात ‘हाफकीन’या व्यक्तीकडून औषधं घेणं बंद करा, असं केलेल्या त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांना उत्तरं देतांना त्यांची दमछाक झाली होती. आता पुन्हा जोशात भाषण देत असतांना त्यांनी केलेलं वक्तव्यही असेच असल्याने त्यांना रोषाचा सामना करावा लागत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com