BJP : भाजपच्या चार महिला आमदारांना गंडा घालणारे दोघे पुणे पोलिसांच्या जाळ्यात

आई आजारी असल्याचे कारण सांगत मुकेश राठोड (Mukesh Rathod) नावाच्या तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती.
BJP : भाजपच्या चार महिला आमदारांना गंडा घालणारे दोघे पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : राज्यातील भाजपच्या (bjp) चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीला पुणे पोलिसांनी (pune police) दोन जणांना औरंगाबाद येथून अटक केली आहे. (bjp news update)

आई आजारी असल्याचे कारण सांगत मुकेश राठोड (Mukesh Rathod) नावाच्या तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आमदारांनीही मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे यांना मुकेश राठोडने गंडा घातला होता. मुकेश राठोडला पुणे पोलिसांनी आज अटक केली आहे.

BJP : भाजपच्या चार महिला आमदारांना गंडा घालणारे दोघे पुणे पोलिसांच्या जाळ्यात
Sanjay Raut : ईडी कारवायांवर राऊतांचे टि्वट, ओशोंच्या शब्दात फटकारलं..

आई आजारी असल्याचं कारण देत मुकेश राठोड याने या आमदारांकडे आर्थिक मदतीची मागणी केली. मेडिकल आणि हॉस्पिटलचे बिल देण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत त्यांने मतदतीची मागणी केली होती. त्यानुसार आमदार माधुरी मिसाळ, देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर आणि श्वेता महाले यांनी त्याला ऑनलाईन माध्यमातून आर्थिक मदतही केली.

या चारही आमदारांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आमदार माधुरी मिसाळ यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

औरंगाबादमधून दोघांना अटक

पुणे पोलिसांनी या आरोपींना औरंगाबादमधून अटक केली आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुकेश राठोड हा बुलढाणा येथील आहे. तो औरंगाबादमध्ये शिकायला आला होता तर सुनीता क्षीरसागर ही देखील औरंगाबादची आहे. हे दोघेही एमपीएससीचा अभ्यास करतात. पैशांची गरज होती म्हणून त्यांनी या महिला आमदारांना भेटून त्यांच्याकडून मोबाईल क्रमांक मागितला होता. सुनीता क्षीरसागर हिच्या गुगल पे वर सगळा व्यवहार करण्यात आला आहे. हे दोघे ही शेतकरी कुटुंबातील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com