अशोक पवार-निवृत्तीअण्णा गवारेंच्या लढाईत आता पाचर्णेंची एंट्री

पुणे जिल्हा बॅंकेसाठी शिरूर-हवेलीतील भाजपच्या चौघांनी भरले अर्ज
Pradip kand-Rahul Pacharne-Dada Patil Farate-Rohidas Undre
Pradip kand-Rahul Pacharne-Dada Patil Farate-Rohidas UndreSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अशोक पवार (Ashok Pawar) विरुद्ध ज्येष्ठ संचालक निवृतीअण्णा गवारे अशी निवडणूक होण्याची चिन्हे असतानाच सोमवारी (ता. ६ डिसेंबर) शिरुर-हवेलीतील चौघांनी अर्ज भरून निवडणुकीत रंगत आणली आहे. विशेष म्हणजे ज्या मतदार संघात आमदार पवार, संचालक गवारे आहेत, त्याच अ वर्ग मतदार संघात भाजपचे (BJP) माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, शिरूर आणि हवेलीचे भाजप तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे व रोहिदास उंद्रे यांनीही इतर गटांतून अर्ज भरून राष्ट्रवादीच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. (Four BJP candidates from Shirur-Haveli have filed applications for Pune District Bank)

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरुर-हवेलीतून आमदार अशोक पवार यांच्या विरोधात ज्येष्ठ संचालक निवृत्तीअण्णा गवारे अशी निवडणूक होण्याची चर्चा रंगली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या चौघांनी अर्ज भरले आहेत. अ वर्ग मतदार संघातून आता आमदार पवार, गवारे आणि पाचर्णे, उंद्रे अशी लढत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी माघारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. याशिवाय प्रदीप कंद, दादापाटील फराटे, रोहिदास उंद्रे यांनी अर्ज भरल्याने निवडणुकीला रंगत येणार, हे मात्र निश्चित.

Pradip kand-Rahul Pacharne-Dada Patil Farate-Rohidas Undre
हर्षवर्धन पाटलांमुळे ताकद वाढलेल्या आप्पासाहेब जगदाळेंनी भरला अर्ज : राष्ट्रवादीच्या डावपेचाकडे लक्ष!

शिरुरमधून भाजपचे तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे यांनी ड वर्ग मतदार संघातून, तर हवेलीचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे यांनीही अ वर्ग सोसायटी मतदार संघातून, तर क वर्ग प्रतिनिधी मतदार संघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी अर्ज दाखल केल आहेत. प्रदीप कंद हे प्रथमच सहकार क्षेत्रातील निवडणुकीत उतरले आहेत.

Pradip kand-Rahul Pacharne-Dada Patil Farate-Rohidas Undre
शिराळ्याला ३० वर्षांनंतर जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद; उपाध्यक्षपद वसंतदादा घराण्याकडे

दरम्यान, भाजप उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, धर्मेद्र खांडरे, हवेली भाजपा तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, राजेंद्र कोरेकर, सुभाष जगताप, भगवान शेळके, आबा सोनवणे, कैलास सोनवणे, सचिन शेलार, काका खळदकर, आत्माराम फराटे, रवींद्र कंद, दादासाहेब सातव, विजय भोस, संतोष पवळे, माऊली बहिरट, राजेंद्र वाघमारे, शिवाजी वाळके, दत्ता वाळके आदींसह असंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com