लाखाचे बक्षीस नावावर असलेल्या ‘यूपी’तील माजी आमदार पुत्राला पुण्यात अटक

रविवारी रात्री उशीरा हडपसर परिसरात पुणे पोलिसांच्या (Pune Police) मदतीने मिश्रा यास बेड्या ठोकण्यात आल्या.
Crime
Crimesarkarnama

पुणे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सामुहिक बलात्कारणातील विष्णू मिश्रा आरोपीला पुणे पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेश पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील भदोई विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे माजी आमदार (Samajvadi Party Ex-Mla) विजय मित्रा यांचा विष्णू हा मुलगा आहे.

Crime
..म्हणून लोक शिवसेनेला कंटाळले होते; मुख्यमंत्री शिंदे फक्त कारण झाले

रविवारी रात्री उशीरा हडपसर परिसरात पुणे पोलिसांच्या मदतीने मिश्रा यास बेड्या ठोकण्यात आल्या.संबंधित आरोपीबाबत माहिती देणाऱ्यांसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. तसेच त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही काढण्यात आली होती.गेले वर्षभर उत्तरप्रदेश पोलीस मिश्राचा शोध घेत होते.

Crime
फडणवीस भेट आणि भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदेंनी स्पष्टच सांगितले...

विष्णु विजय मिश्रा (वय 34, रा. प्रयागराज, हंडीया, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. विष्णु मिश्रा याचे वडील विजय मिश्रा हे उत्तरप्रदेशातील भदोई विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. ऑक्‍टोबर 2020 मध्ये एका तरुणीने माजी आमदार विजय मिश्रा, त्याचा मुलगा विष्णू मिश्रा व नातेवाईक विकास मिश्रा यांच्याविरुद्ध सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी वाराणसी येथील गोपीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

मिश्रा याच्याविरोधात बेकायदा संपत्ती गोळा केल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.संबंधित गुन्हा दाखल झाल्यापासून विष्णु मिश्रा हा पसार झाला होता. उत्तरप्रदेश पोलीस दलातील अतिरीक्त पोलिस महानिरीक्षकांकडून विष्णु मिश्रा याची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. तसेच मिश्रा परदेशात पळून जाऊ नये, यासाठी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीसही उत्तर प्रदेश पोलिसांनी काढली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com