Murlidhar Mohol News : पुण्यातील विकास प्रकल्पांचा 'कांजूरमार्ग' होऊ देणार नाही! मोहोळांचा आदित्य ठाकरेंना इशारा

Aditya Thackeray News : पुण्यातील वेताळ टेकडीवरुन राजकारण तापले
Murlidhar Mohol, Aditya Thackeray News
Murlidhar Mohol, Aditya Thackeray NewsSarkarnama

Murlidhar Mohol Pune News : वेताळ टेकडी वरुन पुण्यात अनेक दिवसांपासून राजकारण तापले आहे. वेताळ टेकडी बचाव कृती समितीने टेकडीवरील प्रकल्प रद्द करून टेकडीला नैसर्गिक वारसास्थळ, ना विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. याच संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी वेताळ टेकडीला भेट देऊन पाहणी केली. त्यावरुन भाजप नेते माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आरे कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्गच्या जागेवर तीन मेट्रो लाईन्सच्या कारशेडचा अत्यंत अव्यवहार्य पर्याय निवडला होता. स्वतःच्या 'इगो'पायी मुंबईकरांच्या डोक्यावर १० हजार कोटींचा बोजा आला.

Murlidhar Mohol, Aditya Thackeray News
Solapur politics : माढ्यात कुस्तीस्पर्धेत राजकारण तापलं : मोहिते-पाटील अन् खासदार, आमदारांमधील मतभेद चव्हाट्यावर

पर्यावरणाचे रक्षण आणि ज्वलंत नागरी प्रश्नांची सोडवणूक यांचा समतोल न राखता येणाऱ्यांनी पुण्यात येऊन अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे काहीही बोलावे, हा मोठा विनोद आहे. आदित्यजी मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे. तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची आपल्यापेक्षा अधिक जाण आणि तळमळ आहे. कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

नदीकाठसुधार आणि बालभारती-पौडफाट रस्ता हे दोन्ही विकास प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊनच पुढे नेण्यात येत आहेत. तरीही यावर काही पुणेकरांचे आक्षेप असल्यावर त्यावर निश्चितच सुचनांचा विचार करुन पुढे जाऊ. पण बालभारती-पौडफाटा रस्ता रद्दच करण्याची मागणी करण्याचा आदित्य यांना नैतिक अधिकार काय? केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करण्याच्या प्रयत्नांना सुज्ञ पुणेकर थारा देणार नाहीत, अशा शब्दांत मोहोळ यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Murlidhar Mohol, Aditya Thackeray News
Aditya Thackeray News : पुण्यातील वेताळ टेकडीसाठी आदित्य ठाकरे मैदानात; म्हणाले टेकडीचा बळी...

दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले होते, ''पुण्यातील 'मिनी सह्याद्री' म्हणून ओळख असलेल्या वेताळ टेकडीस आज भेट दिली. विकासाच्या नावाखाली जैवविविधतेने संपन्न असलेल्या या टेकडीचाही बळी देण्याचा घाट पुणे (Pune) महानगरपालिकेने घातला आहे,'' असा आरोप त्यांनी केला होता. येथील स्थानिकांचा तसेच पर्यावरणस्नेही संस्थांचा याला विरोध असून या प्रकरणी लक्ष घालून टेकडी वाचवण्यासाठी आपण नककीच प्रयत्न करू,'' असे आश्वासन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com