थोरातांनी पुण्यात राष्ट्रवादीचा केला करेक्ट कार्यक्रम; नेता गळाला लावत दिला धक्का

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आघाडी होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.
Balasaheb Thorat, Pune News
Balasaheb Thorat, Pune NewsSarkarnama

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आघाडी होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. मात्र, अशातच काँग्रेसने राष्ट्रवादीचा एक माजी नगरसेवक गळाला लावला आहे. विश्रांतवाडी भागातून महापालिकेत दोन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून गेलेले माजी नगरसेवक सुनील गोगले यांनी काँग्रेसचे विधी मंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत नुकताच प्रवेश केला.

या वेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यावेळी उपस्थित होते. दरम्यान हा प्रवेश दोन दिवसांपूर्वीच झाला असला तरी महाविकास आघाडीचा संयुक्त महामोर्चा मुंबईत होणार असल्याने काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी नको म्हणून या प्रवेशाबाबत गुप्तता पाळण्यात आली होती.

Balasaheb Thorat, Pune News
जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मंगेश चव्हाणांनी केलं पहिलं 'हे' काम

गोगले हे २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. तर २०१७ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. जोशी व बागवे यांनी गोगले यांच्याशी संपर्क साधून पक्षात येण्याचे आवाहन केले. तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो' यात्रेमुळे प्रभावित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे गोगले यांनी पक्ष प्रवेश करताना सांगितले आहे.

Balasaheb Thorat, Pune News
या दहा मुद्यांमुळे विरोधकांचा मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांनी स्पष्ट सांगितले

दरम्यान, पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीची काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमिवर इतर पक्षातील नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये पहिला प्रवेश झाला आहे. मात्र, या प्रवेशात काँग्रेसने मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीलाच धक्का दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com