शरद पवारांच्या नंतर अजितदादाही उतरणार मैदानात

पिंपरी पालिका निवडणुकीची सूत्रे ही पार्थ पवार यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

पिंपरी-चिंचवड : राज्यात या वर्षअखेरीस व पुढील वर्षाच्या सुरवातीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्याचे रणशिंग राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नुकतेच (ता.१६ आणि १७) फुंकले. त्याला कारणीभूत शहरातील माजी नगरसेवक ठरले. त्यांचे आमंत्रण आणि आग्रह यामुळे शरद पवार हे शहरात कित्येक वर्षांनी आले. आता या माजी नगरसेवकांनी अजित पवार यांची मंगळवारी (ता.१९) भेट घेऊन त्यांना शहरभेटीचे साकडे घातले. ते ही बहूधा शुक्रवारी (ता.२२) पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका निवडणूक तयारीकरिता शहर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या तरुण तुर्कांऐवजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनीच अधिक उत्साह व हुरूप आतापासून दाखवला आहे. त्यात त्यांचा थोडा स्वार्थ आहे. पुन्हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या शहरातील १८० पैकी तीस टक्के माजी नगरसेवकांना पुन्हा तिकिट देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पिंपरी पालिका निवडणुकीची सूत्रे ही पार्थ पवार यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपली वा आपल्या जवळच्या नातेवाईकाची उमेदवारी पक्की करण्यासाठी राष्ट्रवादीच्या या ज्येष्ठ मंडळींनी प्रथम पवारसाहेबांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्याशी अधिक सख्य असलेल्यांचा त्यात समावेश होता, हे विशेष.

Ajit Pawar
देगलूर-बिलोलीचे नेतृत्व करणाऱ्यांना मंत्रीपद, खासदारकी अन् तालिका सभापतीपदही !

दरम्यान, माजी नगरसेवकांची शरद पवार यांनी १६ तारखेला पहिली बैठक घेतली. नंतर दुसऱ्या दिवशी पक्षाचा शहरात मेळावा घेतला. त्यात त्यांनी आगामी पालिका निवडणुकीत निम्मे उमेदवार नवीन व तरुण असतील हे स्पष्ट केले. त्यामुळे आता या माजी नगरसेवकांच्या संघटनेच्या दोन प्रतिनिधींनी मंगळवारी अजितदादांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी (देवगिरी) भेट घेऊन शहर भेटीचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी ते कबूल केले असून शुक्रवारीच ते पिंपरीत बहूदा येतील, असे उपमुख्यमंत्री पवारांची भेट घेतलेले माजी नगरसेवकांच्या संघटनेचे प्रमुख जगदीश शेट्टी यांनी सांगितले. त्यांच्याबरोबर शहरातील ज्येष्ठ नेते आझम पानसरे होते. हे दोघे व भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शहरात खूप वर्षानंतर नुकतेच आणले. आता ते अजितदादांना आणत आहेत. त्यानंतर ते पार्थ पवार यांना सभेसाठी नाही, तर घरगुती भेटी वा अनौपचारिक कार्यक्रमासाठी आणणार आहेत. पण, एका वेळी एकच पवार शहरात असतील, याची दक्षता तथा हुषारीही ते घेत आहेत.

Ajit Pawar
भावना गवळींना चिकुनगुन्या; ईडीसमोर आजही हजेरी नाहीच

२०१७ च्या गत पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे बहूतांश नगरसेवकांचा निसटता पराभव झाला आहे. त्यावेळी राज्यातील सत्तेत असलेला भाजप व पोलिसांच्या राजकारणामुळे हा पराभव झाला असल्याचे शेट्टी यांनी अजितदादांच्या भेटीनंतर 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. हे कारण त्यांनी अजितदादांना दिलेल्या निवेदनातही दिले आहे. या पराभूतांना सक्रिय एकत्र करून सक्रिय करण्याची गरज आहे. कारण पक्षाने ताकद दिली, तर त्यातील नव्वद टक्के पुन्हा निवडून येऊ शकतात. त्यासाठी आपण त्यांची बैठक घ्यावी, अशी विनंती केली आणि दादांनी ती मान्य केली, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यामुळे मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आज मावळ दौऱ्यावर असलेले अजित पवार हे परवा वा त्यानंतरच्या काही दिवसांतच पिंपरी-चिंचवडमध्ये येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com