माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्‌दयविकाराने निधन

विनायक निम्हण यांच्या निधनामुळे ऐन दिवाळीत निम्हण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Vinayak Nimhan
Vinayak Nimhan Sarkarnama

पुणे : पुण्यातील (Pune) शिवाजीनगरचे शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांचे आज (ता. २६ ऑक्टोबर) दुपारी ह्‌दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे. (Former MLA Vinayak Nimhan passed away due to heart Attack)

माजी आमदार विनायक निम्हण आज दुपारी ह्‌दयाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर कुटुंबीयांना त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातच ह्‌दयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले. विनायक निम्हण यांच्या निधनामुळे ऐन दिवाळीत निम्हण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज रात्री उशिरा त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Vinayak Nimhan
ठाकरे गटाचा खासदार शिंदे गटाच्या वाटेवर? रामदास कदमांशी बंद दाराआड केली चर्चा

निम्हण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर दोन वेळा, तर काँग्रेसकडून एकदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. ते सध्या शिवसेनेत होते. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरही शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

Vinayak Nimhan
शिक्षणमंत्री केसरकरांची पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा; शालेय विद्यार्थ्यांना येणार अच्छे दिन...

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार विनायक निम्हण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com