चंद्रकांत पाटलांच्या आधी माजी आमदार मेधा कुलकर्णींनी मारली बाजी

माझा मूळ पिंड शिक्षण विषयात काम करण्याचा आहे
Medha Kulkarni
Medha Kulkarnisarkarnama

पुणे : भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 'शाळा सिद्धी समृद्ध शाळा' या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर पीएचडी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांचे अजून तरी पुढे काय झाले नाही. मात्र, त्यांच्या आधी शासनाच्या शाळा मुल्यमापन उपक्रमावर कुलकर्णी यांनी संशोधन केले. यासाठी डॉ. ललिता वर्तक यांनी कुलकर्णी यांना मार्गदर्शन केले आहे.

मुळच्या प्राध्यापिका असलेल्या मेधा कुलकर्णी यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. कुलकर्णी म्हणाल्या, ''माझा मूळ पिंड शिक्षण विषयात काम करण्याचा आहे. शाळेची गुणवत्ता वाढ आणि त्यासाठीचे प्रयत्न हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. गेल्या चार वर्षापासून 'शाळा सिद्धी समृद्ध शाळा' या शाळांच्या मूल्यमापन उपक्रमासंदर्भात संशोधन सुरू सुरू होते. या संशोधनाचा सर्व स्तरातील सर्व शाळांना तसेच शासकीय व्यवस्थेला शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोग होईल याची खात्री वाटते. यात माझ्या कुटंबियांचेही योगदान आहे. माझ्या आईबाबांच्या तीन मुलांपैकी दोघेजण आधीच डॉक्टर उपाधी लावत होते. मी राहिले होते. माझे दिवंगत सासू सासरे आज असते तर त्यांनाही आनंद झाला असता त्यांची आज प्रकर्षाने आठवण येत आहे.'' अशी भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

Medha Kulkarni
परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत गुंतलेत!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन करत ''राजकारण समाजकारणासारख्या व्यस्ततेच्या क्षेत्रात कार्यरत असताना पीएचडी प्राप्त केली है गैरवास्पद आहे.'' अशा शुभेच्छा दिल्या. मेधा कुलकर्णी पुणे महापालिकेच्या दोन वेळा नगरसेविका होत्या. २०१४ मध्ये त्या कोथरूड विधानसभा मतदरसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून गेल्या. मात्र, २०१९ ला विधानसभेच्या निवडणूकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आल्याने त्यांचे तिकिट कापले गेले.

Medha Kulkarni
अमित शहा आणि शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर

त्यानंतर मेधा कुलकर्णी या साईड ट्रॅक झाल्या होत्या. पक्षातील कार्यक्रमांमध्ये देखील त्यांची अनुपस्थिती जाणवत होती. जून महिन्यात कुलकर्णी यांना महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांची दिल्लीत भेट घेऊन पुन्हा राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. दरम्यान, कुलकर्णी यांना पीएचडी केली. तसेच विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पीएचडीचा विषय राजकारणात चांगलाच चर्चीला गेला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत. त्यांच्यावर माझा अभ्यास सुरू असून लवकरच पवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचे काही पाटील यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com