आमदारसाहेब हे तुमचं वागण बर नव्हं...भेगडेंचा, शेळकेंना खोचक टोला

मावळच्या आजी, माजी आमदारांत कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले आहे
Sunil Shelke, Sanjay Bhegade
Sunil Shelke, Sanjay BhegadeSarkarnama

पिंपरी : राज्याचे माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी भाजप (BJP) आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी क्रशर व्यावसायिकांकडून जीवाला धोका असल्याने आपली सुरक्षा वाढवावी अशी मागणी पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे नुकतीच केली आहे. त्यावर क्रशर व्यावसायिक हे माफिया नसल्याने भेगडेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी हमी त्यांचे भाचे मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shekle) दोन दिवसांपूर्वी दिली होती.

त्यावर शेळकेंना स्थानिक भूमीपुत्रांविषयी अचानक तळमळ का? असा सवाल भेगडे यांनी आज विचारला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील गौण खनिज उत्खननावरून मावळच्या आजी, माजी आमदारांत कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले आहे. शेळकेंनी दोन दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर केलेले विधान हे त्यांच्या राजकीय, शैक्षणिक व कायदेशीर अज्ञानातून केले आहे. त्यामुळे या बेताल व बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करतो, असा प्रतिहल्ला भेगडेंनी आज केला.

Sunil Shelke, Sanjay Bhegade
Shivsena : ठाकरेंचा धसका, दौरा जाहीर होताच सत्तारांकडून खासदार शिंदेच्या सभेचे नियोजन..

मावळ तालुक्यातील बेकायदेशीर उत्खननाबाबत हरित लवादात तक्रार प्रलंबित असल्याने त्याबाबत कोणत्याही प्रकारचे विधान करणार नाही. मात्र, निकालाअंती सत्य समोर येईल, असे ते पुढे म्हणाले. मात्र, शेळकेंच्या भुमिपुत्रांच्या आस्थेबद्दल मला खूप आश्चर्य वाटत आहे, कारण मावळ तालुक्यातील भुमिपुत्रांना ज्ञानदान करणाऱ्या इंद्रायणी विद्यामंदीरच्या बांधकामास राजकीय दबाब निर्माण करून शेळकेंनी स्थगिती आणली.

५००० विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या मावळभुषण मा. कृष्णराव भेगडे व कै. केशवराव वाडेकर व अनेक जेष्ठ संचालकांनी जतन केलेली व उद्योजक रामदासआप्पा काकडे यांच्या नेतृत्वात संस्था विकसित होत असताना शेळकेंच्या 'कर्तृत्वां'मुळे संस्थेच्या विकासाला खिळ बसून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

Sunil Shelke, Sanjay Bhegade
Bhide Guruji : भिडे गुरूजी महिला पत्रकाराला म्हणाले, आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलीन !

तसेच गेल्या अडीच वर्षामध्ये स्थानिक भुमिपूत्र कर्ज घेऊन व्यवसायांमध्ये स्थिरस्थावर होत असताना, राजकीय आकसापोटी शासकीय यंत्रणेस वेठीस धरून, भुमिपुत्रांच्या व्यवसायावर व घरादारांवर नांगर फिरवण्याचे आदेश देताना, स्थानिक भुमिपुत्रांविषयीची तळमळ कुठे धूळ खायला गेली होती, आमदारसाहेब हे तुमचे वागण बर नव्हे.., अशी खोचक विचारणा भेगडेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in