पुण्यात भाजपाच्या फ्लेक्सवरून माजी महापौर गायब !

या माध्यमातून भाजपातील अंतर्गत गटबाजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
BJp pune
BJp puneSarkarnama

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी पुण्यात शहरभर लावलेल्या फ्लेक्सवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना टाळण्यात आले आहे. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शहराध्यक्ष म्हणून स्वतंत्रपणे तर माजी सभागृह नेते गणेश बिडकर व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी एकत्रितपणे लावलेल्या फ्लेक्सवरदेखील माजी महापौर मोहोळ यांना टाळण्यात आले आहे.

BJp pune
अजित पवार नसते तर महाआघाडी सरकारचं टिकलं नसतं : मोहितेंचा खळबळजनक दावा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स पाहायला मिळाले. शहर भाजपच्या वतीने शहरातील मोक्याच्या विविध जागांवर मोठे फ्लेक्स उभारण्यात आले आहेत.मात्र, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. शहरातील विविध भाजपा नेत्यांचे फोटो असताना महापौर राहिलेले मोहोळ यांचा फोटो का लावला नाही, अशा चर्चां आता रंगू लागली असून या माध्यमातून भाजपातील अंतर्गत गटबाजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

BJp pune
शिवसेनेच्या दुसऱ्या संजयला माझ्यापेक्षा एक मत जास्त मिळेल! राऊतांना आत्मविश्वास

कोथरूडचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे कोथरूडसह शहराच्या विविध भागात पाटील यांना शुभेच्छा देणारे मोठ्या आकाराचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह अनेक नेत्यांची फ्लेक्सवर फोटो आणि नावे दिसली. मात्र, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा फोटो सोडाच साधा उल्लेखदेखील टाळण्यात आल्याचे दिसत आहे.

महापालिकेतील भाजपाची संत्ता संपुष्टात येऊन जवळपास तीन महिने होत आहेत. सत्तेच्या पाच वर्षांच्या काळातदेखील पक्षातील गटबाजी कमीअधिक प्रमाणात पुढे येत होती. मात्र, आता सत्ता गेली आहे. महापालिका निवडणुकीला अद्याप सुमारे तीन महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे सत्ता गेल्यानंतरदेखील पक्षातील गटबाजी या ना त्या कारणाने पुढे येत असल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com