खेड काँग्रेसचा शेवटचा बुरूजही ढासळला; आक्रमक अमोल पवारांचा शिवसेनेत प्रवेश

खुद्द उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना ‘अमोल पवार यांच्या रूपाने एक तगडा गडी शिवसेनेला मिळाला आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.
खेड काँग्रेसचा शेवटचा बुरूजही ढासळला; आक्रमक अमोल पवारांचा शिवसेनेत प्रवेश

आंबेठाण (जि. पुणे) : एकेकाळी आमदारपदापासून सर्व सत्तास्थानांवर वर्चस्व गाजवलेल्या काँग्रेस (congress) पक्षाचे अस्तित्व शोधण्याची वेळ खेड (Khed) तालुक्यात आली आहे. पक्षाचा एकमेव आक्रमक चेहरा असलेले आणि काँग्रेसचे खेड पंचायत समितीचे सदस्य अमोल पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले आहे. पवार यांच्या शिवसेना (Shivsena) प्रवेशामुळे काँग्रेसचा अखेरचा चिराही ढासळला आहे. (Former deputy chairman of Khed Panchay Samiti, Congress leader Amol Pawar joins Shiv Sena)

अमोल पवार हे पंचायत समितीची मागील पंचवार्षिक निवडणूक हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी पंचायत समितीचे उपसभापती म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र, त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खेड तालुक्यातील काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. बंडानंतर खेड शिवसेनेला एक आक्रमक चेहरा मिळाल्याने शिवसेनेत काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी या वेळी बोलताना ‘अमोल पवार यांच्या रूपाने एक तगडा गडी शिवसेनेला मिळाला आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

खेड काँग्रेसचा शेवटचा बुरूजही ढासळला; आक्रमक अमोल पवारांचा शिवसेनेत प्रवेश
राष्ट्रवादीला धक्का; आमदार बेनकेंच्या निष्ठावंताचा शिवसेनेत प्रवेश!

माजी आमदार (स्व.) नारायणराव पवार यांच्या विचाराने अमोल पवार यांनी आजपर्यंत खेड तालुक्यात राजकारण केले आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीत खेड विधानसभेवर भगवा फडकावणार असल्याचेही पवार यांनी शिवसेनेतील प्रवेशानंतर सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहीर, रवींद्र मिर्लेकर आदी उपस्थित होते.

खेड काँग्रेसचा शेवटचा बुरूजही ढासळला; आक्रमक अमोल पवारांचा शिवसेनेत प्रवेश
मल्लिकार्जून खर्गे यांचा मोठा निर्णय; विरोधी पक्षनेतेपदाचा दिला राजीनामा

दरम्यान, माजी उपसभापती अमोल पवार यांच्यासोबतच खेड खरेदी-विक्री संघाचे संचालक चेतनराव बोत्रे, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल येवले, कुरकुंडीचे माजी सरपंच सचिन भोकसे, माजी सरपंच अर्जुन गोगावले, सयाजी कोळेकर, खेड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संतोष भसे, विनोद येवले, अभय बळवंतराव डांगले, रोहिदास मुंगसे, गणेश भसे, संदीप चव्हाण आदींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. इतर पक्षांचेही तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in