राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात; भाजपच्या निवडणूक सूत्रधाराचा प्रवेश, नगराध्यक्षांचे पतीही संपर्कात

आळंदीचे भाजपचे माजी नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Vilas Kurhade Joins NCP
Vilas Kurhade Joins NCPSarkarnama

आळंदी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला (BJP) गळती लागली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) इनकमिंग जोरात सुरू झाले आहेत. शिवसेनेच्या चाकणच्या माजी उपनगराध्यक्षांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता आळंदीचे माजी नगराध्यक्ष विलास कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले आहे. तसेच, शिरूरमधील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश धुमाळ यांनीही आपल्या सहकाऱ्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. (Former BJP council chairman of Alandi Vilas Kurhade joins NCP)

आळंदी नगरपरिषदेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत संपत आली असून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्याने भाजपचा आळंदीतील जोर हळूहळू कमी होत आहे. खुद्द नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पती अशोक कांबळे आणि मुलगा अभिषेक यांचीही राष्ट्रवादीशी जवळीक वाढली आहे. माजी नगराध्यक्ष तथा मागील निवडणुकीतील भाजपचे मुख्य सुत्रधार विलास कुऱ्हाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आळंदी राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. मागील निवडणुकीत बंधू अशोक कुऱ्हाडे यांचा नवख्या मुलाकडून झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. मात्र, निवडणुकीतील मोर्चेबांधणीसाठी आजही त्यांच्या घरी अनेकजण चकरा मारतात, त्यामुळे आळंदीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कुऱ्हाडेंकडे पुन्हा सरकाला आहे.

Vilas Kurhade Joins NCP
राष्ट्रवादीचे आमदार मानेंना आपल्याच शब्दाचा विसर; दीड वर्षानंतरही विजेचा प्रश्न कायम

आमदार दिलीप मोहिते यांना मागील निवडणुकीच्या तोंडावर मातृशोक झाल्याने त्यांनी निवडणूकीतून अंग काढून घेतले होते. त्यामुळे आळंदीत राष्ट्रवादीची फरफट झाली होती. मागील निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणे शक्य झाले नव्हते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आळंदीत राष्ट्रवादी हळूहळू पाय रोवू लागली आहे. वास्तविक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान जास्त आहे. मात्र, स्थानिक पातळीवर नगरपरिषद निवडणूक आली की, राष्ट्रवादीचा मतदानाचा टक्क घसरतो. पक्षाला मानणारे मतदार असूनही त्याचे मतामध्ये रूपांतर करता येत नसल्याने राष्ट्रवादी चिन्हावर कधीच पालिकेत राज्य करू शकली नाही, त्यामुळे आमदार दिलीप मोहिते यांनी आता चाकण, आळंदी, राजगुरूनगर पालिकांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू असले तरी निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या प्रवेशामुळे आपल्याला संधी मिळण्याची शक्यता धूसर होत असल्याने निष्ठावान कार्यकर्ते पदाधिकारी मात्र नाराज असल्याचे चित्र आहे.

Vilas Kurhade Joins NCP
आमदार मोहितेंचा शिवसेना-भाजपला दणका; माजी उपनगराध्यांसह गोरे गटाचे कट्टर समर्थक राष्ट्रवादीत

शिरूरमध्येही भाजपला झटका

रांजणगाव गणपती : शिरूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश धुमाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या पुढाकाराने हा चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथे पक्षप्रवेश झाला. यावेळी माजी सरपंच मच्छिंद्र धुमाळ, उपसरपंच राहुल नानेकर, संतोष भोसले, सुभाष नानेकर यांच्यासह १५ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com