सुनेच्या आत्महत्येप्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षांना अटक

Crime News : प्रियंकाच्या आत्महत्येने आळंदीच नाही, तर पिंपरी-चिंचवडही हादरले आहे.
Alandi Crime News
Alandi Crime NewsSarkarnama

Crime : फेब्रुवारीत मुदत संपलेल्या आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi Municipal Council) नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर (कांबळे) यांना सुनेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आळंदी पोलिसांनी (Pimpri Police) आज (ता.11 जुलै) ताब्यात घेतले.

हुंडाबळीच्या या गुन्ह्यांत त्यांचे पती अशोक भगवान उमरगेकर-कांबळे व मुलगा अभिषेक (तिघेही रा. संतोषी माता मंदिरामागे, आळंदी) यांना आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी नगराध्यक्षांची सून प्रियंका (वय २९) यांनी काल (ता. १० जुलै) रात्री साडेआठ वाजता गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली होती. (Alandi Crime News)

Alandi Crime News
धक्कादायक! मिरजेतील 9 जणांची आत्महत्या नसून हत्या; दोघांनी जेवणातून दिले होते विष

प्रियंकाच्या आत्महत्येने आळंदीच नाही, तर पिंपरी-चिंचवडही हादरले. कारण ती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाजपच्या माजी नगरसेविका कमल अनिल घोलप यांची मुलगी आहे. तिचे वडिल अनिल ऊर्फ बापू अभिमान घोलप (वय ४५, रा. निगडी-प्राधिकरण) हे पिंपरी-चिंचवडमधील मोठे भंगार व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांनीच या घटनेबाबत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार हुंड्यासाठी छळ असह्य झाल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांनीच सासू, सासरे व पतीने प्रियंकाचा हुंडा, फर्निचर व इतर साहित्यासाठी छळ सुरु केला. तिला अपमानास्पद वागणूक देण्यास सुरवात केली. म्हणून त्याला वैतागून शेवटी तिने जीव दिला. तिचे सात महिन्यांपूर्वीच गेल्यावर्षी १६ नोव्हेंबर रोजी प्रियंकाचे लग्न झाले होते.

Alandi Crime News
पाच कोटींसाठी विश्वासू साथीदारानेच केला चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक खुलासा

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून चाकण विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी घटनास्थळी लगेचच भेट दिली. आळंदी पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. प्रियंकाचा मृतदेह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव स्मृती रुग्णालयात आणण्यात आला. तेव्हा तेथे मोठी गर्दी झाली होती. तेथे शवविच्छेदनात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे सिद्ध झाले. पाच महिन्यांपूर्वी १६ फेब्रुवारी आळंदी नगरपरिषदेची मुदत संपली. तोपर्यंत उमरगेकर नगराध्यक्षा होत्या. सध्या खेडचे तहसीलदार आळंदीत प्रशासक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com