Chinchwad By Poll Election Result : 'चिंचवड'साठी आमदार लांडगे अन् शेळकेंची प्रतिष्ठा पणाला

NCP Vs BJP : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडकर कोणाच्या पाठीशी?
Mahesh Landge, Sunil Shelke
Mahesh Landge, Sunil ShelkeSarkarnama

MLA Mahesh Landge and Sunil Shelke : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. २६) मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल येत्या गुरुवारी (२ मार्च) लागणार आहे. त्या निवकालावर भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चिंचवड (Chinchwad) निवडणूक अंतिम टप्प्यात मुद्द्यांवरून गुद्यांवर उतरली होती. ही निवडणूक पैसेवाटप आणि वादांमुळे गाजली. येथे वादाची चार प्रकरणे घडली आहेत. त्याप्रकरणी चार गुन्ह्यांची नोंदही झालेली आहे.

गेल्या पाच वर्षांत पिंपरी पालिकेत (PCMC) भाजपने केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत का उचलला नाही, याचे गूढही जनतेला उकलले नाही. तसेच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, अस्वच्छता, शहराचा स्वच्छतेत घसरलेला दर्जा यावरही प्रचारात भर दिसला नाही.

निवडणुकीत फक्त वैयक्तिक टीका झाली. राज्य पातळीवरील समस्यांवरून पक्षांत 'तू-तू, मैं-मैं' झाली. असे अनेक कंगोरे चिंचवडची निवडणूक व आता तिच्या निकालालाही असणार आहे.

Mahesh Landge, Sunil Shelke
Bhaskar Jadhav News : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधव अनेकदा फोन करायचे : मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाचा खळबळजनक दावा

या निवडणुकीच्या निकालावर आमदार लांडगे आणि शेळके यांची प्रतिष्ठा ही एक सर्वात मोठी बाजू अवलंबून आहे. कारण लांडगे Mahesh Landge हे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षही आहेत. त्यामुळे शहरातील चिंचवडच्या त्यांच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या निवडून येणे त्यांच्या दृष्टीने आवश्यकच आहे.

त्यात अध्यक्ष झाल्यावर या पहिल्या आणि थेट आमदारकीच्याच पोटनिवडणुकीला ते सामोरे गेले आहेत. त्यात त्यांचा कस लागला आहे. त्यामुळे हा निकाल त्यांची प्रतिष्ठाही वाढविणारा ठरणार आहे.

Mahesh Landge, Sunil Shelke
Manish Sisodia : विदर्भातही ‘आप’चे कार्यकर्ते आक्रमक, भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी !

ही पोटनिवडणूक आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रंगीत तालीम होती. तिच्या निकालाने विजयी आमदारांच्या पक्षाला पालिका निवडणुकीसाठी मोठे बळ मिळणार आहे. २०१७ ला पालिकेत आलेली सत्ता भाजपला टिकवायचीच नसून तेथील संख्याबळ वाढवायचेही आहे.

त्या पार्श्वभूमीवरच लांडगे यांनी ७७ नगरसेवकांवरून आता शंभर प्लसचा नारा दिलेला आहे. त्यासाठी आमदार लांडगेंनी आपली पूर्ण ताकद आणि दोन आमदारकीच्या विजयाचा अनुभव पणास लावला आहे. म्हणूनच काय त्यांनी आमचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्वास मतदानानंतर व्य़क्त केला आहे.

Mahesh Landge, Sunil Shelke
G-20 News : नव्या बदललेल्या डिजीटल इंडियाची चावी महिलांच्या हाती..

दुसरीकडे आमदार शेळके Sunil Shelke यांच्यावर राष्ट्रवादीने चिंचवड पोटनिवडणुकीच्या निरीक्षकाची जबाबदारी दिली आहे. तसेच पक्षाच्या वीस स्टार प्रचारकांत त्यांचाही समावेश होता. म्हणून चिंचवडमध्ये त्यांचे उमेदवार नाना काटेंचा विजय त्यांच्यासाठी क्रमप्राप्तच आहे. त्यांची प्रतिष्ठा आणखी उंचावणारा हा निकाल असणार आहे.

यामुळेच त्यांनी आपली ताकद व कौशल्य तेथे पणास लावले. आपले पदाधिकारी, कार्यकर्ते मावळातून चिंचवडला आणले. २०१९ ला ते विक्रमी मतांनी पहिल्यांदाच विधानसभेला निवडून आले आहेत. त्यांचा तो विजयाचा मावळ पॅटर्न चिंचवडला फळाला येणार का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी मावळसह पुणे जिल्ह्याचे लक्ष २ मार्च रोजी होणाऱ्या निकालाकडे लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in