Chinchwad By- Election : चर्चा तर होणारच...! अश्विनी जगतापांसाठी मुलींसह संपूर्ण कुटुंब मैदानात

लक्ष्मण जगताप यांचे निधन यावर्षी ३ जानेवारीला कर्करोगाने झाल्यावर लगेच १५ दिवसांतच १८ जानेवारीला ही निवडणूक लागली.
Chinchwad By- Election
Chinchwad By- ElectionSarkarnama

Chinchwad By-Election : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे येत्या रविवारी (ता.२६) या मतदारसंघाच्या होत असलेल्या निवडणुकीत दिवंगत जगतापांच्या पत्नी अश्विनी या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांची एकुलती एक विवाहित पुणेकर कन्या ऐश्वर्या रेणूसे हीच नाही,तर तिच्या पाच भावंडासंह दिवंगत आमदारांच्या दोन्ही भाऊ असे संपूर्ण कुटुंबच प्रचारात रंगल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

ऐश्वर्यासह तिची चुलत बहिण शिवानी आणि राजेश्वरी सावंत (लक्ष्मण जगतापांचे बंधू विजय जगतापांच्या कन्या आणि शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या सून), चुलतभाऊ आर्यन व आदित्य (दुसरे बंधू शंकर जगताप यांची मुले) विरेन विजय जगताप ही तिची भावंडेही आपल्या चुलतीचा हिरीरीने प्रचार करीत आहेत. रेणूसे हे पुण्यातील हॉटेल, शिक्षण आणि बांधकाम क्षेत्रातील एक मोठे प्रस्थ आहेत. तर, जगतापांचे दुसरे व्याही सावंत हे सुद्धा शिक्षण क्षेत्रातील मोठं नाव आहे.

Chinchwad By- Election
Praniti Shinde : राहुल गांधींना सर्वसामान्य माणूस जसा मिठी मारू शकतो, तशी मोदींना मारण्याची हिंमत होईल का?

लक्ष्मण जगताप यांचे निधन यावर्षी ३ जानेवारीला कर्करोगाने झाल्यावर लगेच १५ दिवसांतच १८ जानेवारीला ही निवडणूक लागली. त्यामुळे जगताप कुटुंबाला पूर्ण शोकही करता आला नाही आणि त्यांना निवडणुकीची तयारी करावी लागली. घरात लक्ष्मणभाऊ यांना राजकीय वारसा तसा नव्हता. ते व त्यांचे बंधू शंकर जगताप हेच राजकारणात सक्रिय होते. शंकर जगताप हे माजी नगरसेवक राहिले आहेत. तर, सध्या ते भाजपचे चिंचवड विधानसभा प्रभारी आहेत. म्हणजे आपल्या भावजयीला निवडून आणण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच मोठी आहे. त्यात खारीचा वाटा त्यांची दोन मुले, बंधू विजय आणि त्यांच्या तीन मुलांनी उचललेला आहे.

ही पोटनिवडणूक लागल्यानंतर उमेदवारी ही जगताप कुटुंबातच दिली मिळणार हे निश्चीत होते.पण, ती पत्नी की भावाला (शंकर) यावरून कुटुंबात मतभेद असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. हे संपूर्ण कुटुंबच एकदिलाने आणि एकजुटीने प्रचारात उतरल्याने या अफवांना नंतर पूर्णविराम मिळाला. यासंदर्भात अश्विनी जगताप यांनी आमचे एकत्र कुटुंब असून भाऊ (पती लक्ष्मण जगताप) आणि माझ्य़ावरील प्रेमापोटी संपूर्ण कुटुंब प्रचारात सहभागी झाले असल्याची प्रतिक्रिया `सरकारनामा`शी बोलताना दिली. या त्यांच्या एकत्रित व एकदिलाच्या प्रचारामुळे माझा शंभर टक्के विजय होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com