भाजप नगरसेवकाच्या खूनप्रकरणातील प्रमुख आरोपीचे झळकले फ्लेक्स!

दोन नगरसेवकांना एका गुंडाने मारण्याची धमकीही दिली होती.
 BJP
BJPsarkarnama

आळंदी (जि. पुणे) : आळंदी (Alandi) नगरपरिषदेमधील भारतीय जनता पक्षाच्या (bjp) नगरसेवक खूनप्रकरणातील प्रमुख आरोपींचा फ्लेक्स शहरातील चौकाचौकांत दिमाखात उभे आहेत. गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे फ्लेक्स आणि पालिका कार्यालयासमोरच मोठा जंबो फ्लेक्स लागल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त केली जात आहे. (Flex of main accused in the murder case of BJP corporator in Alandi)

भाजप नगरसेवकाची चार वर्षांपूर्वी भरचौकात खून झाला होता. त्याच दरम्यान दोन नगरसेवकांना एका गुंडाने मारण्याची धमकीही दिली होती. याबाबत तत्कालिन पालकमंत्री गिरीष बापट यांच्याकडे याबाबत तक्रारही करण्यात आली होती. त्यानंतरही आळंदीतील अवैध धंदे आणि गुन्हेगारांचा वावर कमी झालेला नाही. याउलट पालिका कार्यालयासमोरच पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांचा अड्डा दिसत आहे. विद्यमान नगरसेवकही त्याबाबत मूग गिळून गप्प आहेत.

 BJP
बायको सोडून गेली अन्‌ गाव मला ‘मोदी’ म्हणू लागले : पटोलेंचा ‘गावगुंडा मोदी’ अखेर प्रकटला!

दुसरीकडे सध्याचे पालिका प्रशासन बेफिकिर तर पोलिस प्रशासन आमचा संबंध नाही, अशा भूमिकेत असल्याचे चित्र आहे. गेली तीन दिवस पालिका कार्यालयासमोरील शाळेच्या इमारतीवर हा गुंडाचा फ्लेक्स झळकत होता. आता तो जागा बदलून पालिका रिक्षा स्टॅडवर लावण्यात आला आहे. तसेच इंद्रायणी काठच्या पुलावर, पुणे-आळंदी रस्त्यावर प्रमुख चौकात फ्लेक्स झळकत आहे. गुंडाचा वाढदिवस आणि रक्तदान शिबिर असा आशय फ्लेक्सवर आहे.

 BJP
चंद्रकांतदादांनी राज्यपालांकडे केली प्रताप सरनाईकांची तक्रार

वास्तविक फ्लेक्सला परवानगी आहे की नाही, याबाबत मुख्याधिकाऱ्यांनाही खबर नाही. शहराचे विद्रूपीकरण कायद्यांतर्गत कारवाईचे अधिकार असूनही प्रशासन डोळेझाक करत आहे. परवानगी देताना त्या व्यक्तीचे चारित्र्य पडताळणीही केली जात नाही. बाजारवसुली, वाहनतळ वसुली, कामगार पुरवठा ठेका जरी एकाच्या नावावर असला तरी प्रत्यक्ष काम करणारे, आर्थिक वसुलीसाठी गुन्हा दाखल असलेलेच लोक आहेत. यामुळेच आळंदीत गुंडांचे फावले आहे.

 BJP
मला पैसे मागितले, आता राजीनामा देणार! डिसले गुरुजींचा गौप्यस्फोट

याबाबत नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर म्हणाल्या की, फ्लेक्स लावण्याबाबत परवानगी देण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. मागील वेळी एका नगरसेविकेने स्वतः प्रशासनासोबत बेकायदा फ्लेक्सविरोधात आवाज उठवला. प्रशासन निष्क्रिय असल्याचे चित्र आहे.

 BJP
अजितदादा इमानाने काम करतात, त्याची जाहिरात करीत नाहीत!

मुख्याधिकारी अंकुश जाधव म्हणाले की, या फ्लेक्सला परवानगी दिली का पहावे लागेल;अन्यथा गुन्हा दाखल करावा लागेल. तसेच, अनाधिकृत फ्लेक्सवर कारवाई करणारे निष्क्रिय कर्मचारी बदलला असून नव्या व्यक्तीची नेमणूक केली आहे. येत्या दोन दिवसांत अनाधिकृत फ्लेक्स हटवले जातील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com