मुख्यमंत्री म्हणतात, पावणेपाच महिन्यांपूर्वी मोठा राजकीय मसाला देण्याचे काम आम्ही केलं

Eknath Shinde| राज्यात सत्ताबदल झाल्याने बदलाची अपेक्षा नक्की पूर्ण होईल.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

पिंपरी : राजकीय नेते आणि पत्रकारांचं नातं हे तुझं माझं जमेना, अन तुझ्यावाचून करमेना असं असलं, तरी दोघांनी हातात हात घालत काम केलं पाहिजे,अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (ता.२०) पिंपरी-चिंचवडमध्ये व्यक्त केली. मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी समारोपात मुख्यमंत्री बोलत होते.

CM Eknath Shinde
बावनकुळे, मुनगंटीवार म्हणतात, राज्यपाल कोणत्या संदर्भाने बोलले माहिती नाही..

या द्वैवार्षिक अधिवेशनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर २५ लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. पत्रकारांच्या विविध समस्या आणि मागण्यांसंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह, शहराचे पोलिस आय़ुक्त अंकुश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

आमच्यात (राजकीय नेते) आलबेल नसतं,तसं ते तुमच्यातही (पत्रकार) नसतं,अशी कोपरखळी मारताना सध्याची पत्रकारिता मात्र अवघड झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पावणेपाच महिन्यांपूर्वी मोठा राजकीय मसाला देण्याचे काम आम्ही केलं,असं सांगत त्यांनी आपल्या बंडाच्या स्मृती पुन्हा जागवल्या. पण, त्यामुळे तुमचाही (पत्रकार) फायदा झाला, टीआरपी वाढला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी राज्यात सत्ताबदल झाल्याने बदलाची अपेक्षा नक्की पूर्ण होईल. कारण मी सकारात्मक दृष्टीने काम करीत असल्याने हा बदल हमखास होईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी पत्रकारांच्या अधिस्वीकृती समिती देखील लवकरच स्थापन केली जाईल, अशी ग्वाही दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in