मृत बांधकाम कामगारांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत : कामगार मंत्री मुश्रीफांची घोषणा

या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांचा उपचारांचा खर्चही सरकार करेल
Yerawada accident
Yerawada accidentSarkarnama

कोल्हापूर : पुणे (pune) शहरातील येरवडा भागात इमारतीच्या स्लॅब कोसळून मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपये देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगारांचा उपचारांचा खर्चही सरकार करेल. तसेच, कामगारांचे मृतदेह त्यांच्या गावी नेण्यासाठी संबंधित ठेकेदाराला आदेश दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. (Five lakh to families of dead construction workers : Labor Minister Mushrif)

Yerawada accident
विजय शिवतारेंचा राजकीय वारस ठरला; ममता लांडेंकडे शिवसेनेची मोठी जबाबदारी!

पुण्यातील येरवडा भागात ग्लास बिझनेस पार्क या नावाच्या इमारतीचे काम सुरू होते. बिहारमधून सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी काही मजूर या बांधकामाच्या साईटवर कामासाठी आलेले होते. इमारतीचे काम सुरू असताना दुर्दैवाने गुरुवारी (ता. ३ फेब्रुवारी) त्या सेंट्रींगच्या जाळीचा राॅड सटकला, त्यामुळे स्लॅब कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. जखमी कामगारांवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Yerawada accident
पुण्यातील दुर्घटनेच्या चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

दरम्यान, हे बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदीत नव्हते. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा अपघात पुण्यामध्ये झाला होता. नोंदीत नसलेल्या कामगारांना त्यांच्या वारसांना ५ लाख रुपये प्रत्येकी देण्यात आलेले होते. आज बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने या पाचही कामगार जे दुर्दैवाने मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. जे मृत्यू पावलेले आहेत, त्याच्या अंत्यविधीसाठी त्यांना गावी पाठवण्याची व्यवस्था कंत्राटदार अहलू वालीया यांना आजच कामगार आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत, असे कामगार मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com