सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का

Pune University Election : विद्यापीठात पहिल्यांदाच राजकीय पक्षांमध्ये लढत
Pune University Election News
Pune University Election NewsSarkarnama

Pune University Election : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत भाजप (BJP) समर्थक विद्यापीठ विकास मंचने बाजी मारली आहे. संस्थाचालक गटातील सहापैकी पाच जागा बिनविरोध निवडून आणत विरोधातील महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निवडणुकीआधीच कुरघोडी केली आहे.

संस्थाचालकांच्या सहापैकी खुल्या गटातून डॉ. राजेंद्र विखे-पाटील, डॉ. अपूर्व हिरे, प्रा. विनायक आंबेकर, अशोक सावंत यांची आणि महिला गटात डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांचा बिनविरोध उमेदवारांत समावेश आहे. एक जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव होती. मात्र, त्याजागेवर उमेदवार मिळाला नाही. म्हणून ती जागा रिक्त राहिली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच संस्थाचालक गटात बिनविरोध निवडणूक झाली आहे.

Pune University Election News
'50 खोके' दुखवताहेत डोके? बंडखोर आमदारांमध्ये वाढतेयं अस्वस्थता...

पुणे विद्यापीठाची निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेत आली आहे. कारण पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीमध्ये थेट राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. भाजप सह विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात महाविकास आघाडीच्या नव्या प्रयोगाला आकाराला आले आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन, सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेलची घोषणा करत, दहा जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होईल, असे सांगितेल जात होते. मात्र, विकास मंचने पाच जागा बिनविरोद करत आघाडी घेतली आहे.

Pune University Election News
कीर्तिकर शिंदे गटात जाताच देसाईंना लागली लॉटरी; ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

दरम्यान, विद्यापीठात आता भाजप आणि महाविकास आघाडी थेट लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, अशा प्रकारच्या राजकारणामुळे विद्यापीठातील वातावरण आणि विद्यार्थी राजकारणात भरडले जाईल? या निवडणुका होताना ते निकोप आणि लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून पार पडतील का? असा प्रश्न अनेकांकडून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in