वळसे पाटलांनी १८ वर्षांत प्रथमच मानले आढळरावांचे जाहीर आभार!

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सुमारे १८ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकत्र काम करत होते.
Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao patil
Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao patilSarkarnama

पारगाव (जि. पुणे) : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao patil) यांनी सहकार्य केले. त्याबद्दल राजकीय मतभेद, वैयक्तिक कटुता विसरून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आढळराव पाटील यांचे गेल्या १८ वर्षांत प्रथमच जाहीररित्या आभार मानले. आंबेगाव तालुक्यातील सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. (For the first time in 18 years, Dilip Walse Patil publicly thanked Shivajirao Adhalrao patil)

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सुमारे १८ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकत्र काम करत होते. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात आढळराव पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. पण, लोकसभा निवडणुकीतील तिकिटावरून आढळराव यांचे वळसे पाटील यांच्यासोबत मतभेद झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली. पहिल्याचा प्रयत्नात ते खासदार झाले. आढळराव यांनी सलग तीन वेळा लोकसभेची निवडणूक लढवून जिंकली. तेव्हापासून वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांच्या कटुता निर्माण झाली.

Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao patil
केंद्रीय मंत्री सीतारामन यांच्यासमोरच राहुल कुलांनी बोलून दाखवली दौंडच्या मंत्रिपदाबाबतची खंत!

आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक असो कि सहकारी सोसायटीची निवडणूक. शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पहावयास मिळत होता. या काळात भीमाशंकर साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील यांनी वळसे पाटील यांच्या विरुध्द विधानसभेची निवडणूकही लढवली होती.

Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao patil
फडणवीसांची विनंती मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यातच मान्य केली अन्‌ नरेंद्र पाटलांच्या नावाची घोषणा केली!

सुमारे तीन वर्षांपूर्वी राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आले. वळसे पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाले. परंतु राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी शिरूर लोकसभा मतदार संघात विशेष करून आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष सुरूच होता. राष्ट्रवादीचे मंत्री सहकार्य करत नसल्याचा आरोप आढळराव पाटील करत होते. त्यातच जून महिन्यात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची जाहीर झाली.

Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao patil
फडणवीस सहा-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कसं पेलवणार..? पण त्यांना माझ्या शुभेच्छा : अजित पवार

भीमाशंकर कारखान्यासाठी राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. मात्र, महाविकास आघाडीचा धर्म पाळत तसेच चांगल्या चाललेल्या संस्थेत राजकारण नको म्हणून आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना माघार घेण्यास सांगितले. अर्ज माघारीच्या मुदती एकूण ८० जणांनी माघार घेतल्याने वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao patil
आठवलेंची डबल ढोलकी : ‘बारामतीत पवारांचा पराभव नको; पण भाजपचा विजय हवा’

शिंगवे-रांजणी गटात तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने तीन जागांसाठी निवडणूक लागली. त्यासाठी ता. १७ जुलै रोजी मतदानही होणार होते; निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच राज्यात सत्ता परिवर्तन झाले शिंदे गट व भाजपचे सरकार सत्तेत आले. मतदानाच्या एक दिवस अगोदरच राज्य सरकारने अतिवृष्टीचे कारण देत ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या, त्यामुळे भीमाशंकरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली नाही. कारखान्याच्या १८ जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी तीन जागांसाठी मतदान होणे बाकी आहे.

Dilip Walse Patil-Shivajirao Adhalrao patil
चव्हाण-देशमुख-पाटलांच्या बालेकिल्ल्यात गिरीश महाजनांना पालकत्वाचे आव्हान

भीमाशंकर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २४ सप्टेंबर) पार पडली. त्यावेळी भाषणाच्या सुरवातीलाच कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आढळराव पाटील यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार असे म्हणताच उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवल्या. वळसे पाटील पुढे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षानेही सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही आभार. तालुक्यात ज्या आर्थिक सहकारी संस्था आहेत, मग आढळराव पाटील यांची भैरवनाथ पतसंस्था असो की आमची शरद सहकारी बँक असो या दोन्ही संस्थांची निवडणूक बिनविरोध होण्यसाठी एकमेकांना सहकार्य केले जाते. जेणे करून चांगल्या चाललेल्या संस्थेत राजकारण नको, असे म्हणत वळसे पाटील यांनी १८ वर्षांत प्रथमच आढळरावांचे जाहीर आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com