मोठी बातमी : शिरूर कोर्ट परिसरात गोळीबार; पत्नीचा जागीच मृत्यू; सासू गंभीर जखमी

पोटगीच्या दाव्याचा निकाल आज शिरूर कोर्टात होता. मात्र, त्यापूर्वीच दीपक याने पत्नी आणि सासूवर गोळीबार केला.
Firing
FiringSarkarnama

शिरूर ः पोटगीच्या दाव्यासंदर्भात शिरूर (shirur) न्यायालयात आलेल्या पतीने पत्नी आणि सासूवर पिस्तूलातून गोळीबार केला. पतीने तीनदा फायरिंग (firing) केली. त्यात दोन गोळ्या लागून पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. सासूला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराने पोलिस आणि जमाव पाहून हवेतही गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. (firing at Shirur Court premises; Wife dies on the spot; Mother-in-law seriously injured)

दीपक पांंडुरंग ढवळे (वय ४५, रा वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने केलेल्या गोळीबारात पत्नी मंजुळा दीपक ढवळे (वय ३५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दीपक याची सासू तुळसाबाई रंगनाथ झांबरे (वय ५५) ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे.

Firing
राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदारांसाठी महाडिकांनी अशी लावलीय फिल्डिंग!

संबंधित लोक हे पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील असून त्यांची आज शिरूर न्यायालयात पोटगीच्या दाव्याला निकाल होता. त्या निकालासाठीच ढवळे आणि झांबरे कुटुंबीय शिरूरच्या कोर्टात आले होते. मंजुळा ढवळे हिने पतीविरोधात पोटगीचा दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी शिरूरमध्ये सुरू होती, त्याचा आज निकाल होता.

Firing
कट्टर समर्थकानं मनसे सोडली पण वसंत मोरे देणार राज ठाकरेंना वाढदिवशी मोठं गिफ्ट!

या निकालासाठी दीपक आपल्या भावासह आला होता, तर मंजुळा ही आपल्या आई तुळसाबाई यांच्याबरोबर कोर्टात आले हेाते. सुरुवातीला या तिघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर हल्लेखोराने कमरेचा पिस्तूल काढून फायरिंग केले. यामध्ये पत्नी मंजुळा हिचा दोन गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू झाला, तर सासू तुळसाबाई ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटगीच्या दाव्याचा निकाल आज शिरूर कोर्टात होता. मात्र, त्यापूर्वीच दीपक याने पत्नी आणि सासूवर गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोर दीपक पांंडुरंग ढवळे याला ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com