मोठी बातमी : पुण्यात अर्थमंत्री सीतारमण यांचा ताफा 'आप'च्या कार्यकर्त्यांनी अडवला...

Nirmala Sitaraman : आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Nirmala Sitaraman Latest News
Nirmala Sitaraman Latest NewsSarkarnama

पुणे : बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांचा ताफा 'आप'च्या कार्यकर्त्यांनी वारजे येथे अडवल्याची घटना घडली आहे. (Nirmala Sitaraman Latest News Pune)

Nirmala Sitaraman Latest News
गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है; मेळावा 'शिवतीर्था'वरच होणार...

महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला. यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Nirmala Sitaraman Latest News
शिवसेनेला रोज संजय राऊत यांची आठवण... तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेत्याची वाणवा

दरम्यान, तीन दिवसांच्या दौऱ्यातील तीनही दिवस सितारमण हॉटेलमध्ये न राहता कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in