
पुणे : केंद्र सरकारने रुपी सहकारी बॅंक वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,असे बॅंकेच्या ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांना साकडे घातले आहे. त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. (Nirmala Sitaraman Latest News)
सीतारमण गुरुवारी बावधन येथील सूर्यदत्त कॉलेजमध्ये एका कार्यक्रमानिमित्त येणार होत्या. त्यामुळे त्यांना निवेदन देण्यासाठी रुपी बँकेचे कर्मचारी जमा झाले होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर यांनी यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
आम्ही सीतारामन यांचे लक्ष वेधण्यासाठी उभे आहोत. फक्त निवेदन देणार आहोत,असे त्यांनी सांगितले. रुपी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पगारवाढ न घेता निष्ठेने सेवा केली. परंतु बॅंकेचा कर्मचारी वर्ग दुर्लक्षित राहिला असून, त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर सीतारामन यांनी निवेदन स्वीकारत मागणीबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान आज अर्थमंत्री सितारमण यांच्या ताफ्याला आज पुण्यातील वारजे माळवाडी भागातील 'आप'चे कार्यकर्त्यांनी अडवला होता. यावेळी महागाई, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.