Kasba Peth Bypoll Election : भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल ; कसब्यात पैसै वाटल्याचा..

Kasba Peth Bypoll Election : पैसे न घेतल्यामुळे महिलेला मारहाण केल्याचा आरोप रमेश बागवे यांनी केला.
Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News
Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News Sarkarnama

Kasba Peth Bypoll Election : कसबा पेठ व चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. कसब्यात भाजपचे हेमंत रासने व काँग्रेसचे रवींद्र धंगेकर या प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत आहे. पैसे वाटपावरुन मतदानाच्या पूर्वसंध्येला (शनिवारी) दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

कसब्यात शनिवारी मध्यरात्री पैसे वाटण्यावरुन राडा झाला. भाजपचे कार्यकर्ते शहराच्या पूर्व भागात पैसे वाटत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

एका महिलेने पैसे न घेतल्यामुळे गंजपेठ भागातील भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांनी तिला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Assembly bypolls in Kasba and Chinchwad latest News
Chinchwad Bypoll Election : धक्कादायक ; मतदान प्रक्रियेचा भंग ; मतदान करतानाचा Video व्हायरल

याप्रकरणी विष्णू अप्पा हरिहर यांचा भाऊ हिरा हरिहर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे न घेतल्यामुळे एक महिलेला त्यांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते, माजी मंत्री रमेश बागवे यांनी माध्यमांसमोर आज केला.

रमेश बागवे म्हणाले, "काल दुपारच्या वेळेस कार्यकर्ते पैसे वाटत होते. परंतु हरिहर यांना हटकल्या प्रकरणी त्यांना राग आला. त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी तब्बल २५ ते ३० लोकांनी येऊन गंज पेठेत येऊन नागरिकांना शिवीगाळ आणि मारहाण केली. या प्रकाराला विरोध केल्याने दर्या कांबळे यांच्या मुलांना, बहिणीला आणि नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार निंदनीय आहे,"

गणेश बिडकर यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, भाजप नेते गणेश बिडकर पैसे वाटत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. बीडकरांनी हा आरोप फेटाळला आहे.

"सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं स्टंट काँग्रेस करीत आहेत. कसब्यात भाजपचा विजय निश्चित दिसत असल्याचे असे आरोप केले जात आहेत. माझ्या बाबतचा अर्धाच व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांना अर्वाच भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली आहे, असे गणेश बिडकर म्हणाले,

"माझ्या राजकीय आयुष्यात इतकं गलिच्छ राजकारण आणि अशी निवडणूक कधी पाहिली नाही.निवडणूक झाल्यानंतर आम्ही रीतसर तक्रार दाखल करणार आहोत. व्हिडिओ काय आहे, त्याबद्दल पोलीस तपास करीत आहेत," असे बीडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in