...अन्यथा पहिल्या बैठकीपासूनच PMRDAविरोधात संघर्ष

पीएमआरडीए फक्त कारवाईसाठी नेमलेली एजन्सी असल्याचा लोकांमधील समजही आता काढून टाकायचे कामही आम्हाला करायचे आहे.
...अन्यथा पहिल्या बैठकीपासूनच PMRDAविरोधात संघर्ष
Yashwant Gavhanesarkarnama

सणसवाडी (जि. पुणे) : पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण PMRDA) हद्दीतील अनधिकृत बांधकामांची यादी संकलन, कायद्यानुसार त्यांच्यावर बांधकामक्रमाने नोटीस कारवाई आणि शेवटी हातोडा अशी बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, मी गेल्या १० दिवसांत तब्बल ५१ गावांमध्ये फिरलोय, त्या गावांमध्ये अशी सुसूत्रता पीएमआरडीए ठेवत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बांधकामांबाबत नियम न पाळल्यास पीएमआरडीए प्रशासनासोबत पहिल्या बैठकीपासूनच आम्हा सर्व सदस्यांचा संघर्ष सुरू होईल, असा इशारा पीएमआरडीएचे शिरूर (shirur) तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्य यशवंत गव्हाणे यांनी सणसवाडी (ता. शिरूर) येथे दिला. (Fight against PMRDA from first meeting if rules are not followed : Yashwant Gavhane)

पुणे शहर व जिल्ह्यातून एकमेव अपक्ष सदस्य म्हणून पीएमआरडीएवर शिरूरमधून निवडून गेलेले यशवंत आबासाहेब गव्हाणे यांचा सध्या तालुक्यातील विविध गावांत सत्काराचा कार्यक्रम तसेच गावभेटी सुरू आहेत. गेल्या दहा दिवसांत सुमारे ५० हून अधिक गावांत निमंत्रित करून त्यांच्यापुढे पीएमआरडीएच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी मांडल्या जात आहेत. गव्हाणे यांनी गेल्या दहा दिवसांत कोरेगाव भीमा, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, कोंढापुरीसह शिरूर-हवेलीतील ५० हून अधिक गावांत जाऊन लोकांच्या तक्रारी ऐकून घेत आहेत.

Yashwant Gavhane
आता नो व्होट टू बीजेपी! शेतकरी झाले आक्रमक

पीएमआरडीएबद्दल लोकांमध्ये आस्था असली तरी त्यांच्या कारवाईच्या पद्धतीबद्दल, त्यांच्या विरोधात तक्रार, त्यांच्याकडे दाद मागणे याबाबत लोक अनभिज्ञ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बहुतांश सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावागावांतील सर्वपक्षीय पदाधिकारी पीएमआरडीएबद्दल अजूनही अजभिज्ञ आहेत. पीएमआरडीए फक्त कारवाईसाठी नेमलेली एजन्सी असल्याचा लोकांमधील समजही आता काढून टाकायचे कामही आम्हाला करायचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, सणसवाडी येथे गव्हाणे यांचा सत्कारसमारंभास उपसरपंच सागर दरेकर, कामगार नेते राजेंद्र दरेकर, नवनाथ हरगुडे, अमोल हरगुडे, काळूराम दरेकर, हनुमंत दरेकर, नवनाथ दरेकर, विजय दरेकर, संदीप दरेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Yashwant Gavhane
लातूर जिल्हा बॅंकेवर देशमुखांचे वर्चस्व कायम; टाॅसवर भाजपनेही एक जागा जिंकली

कार्यपद्धतीबद्दल आमच्याशी संपर्क साधावा

पीएमआरडीएची कारवाई अथवा कार्यपद्धतीबद्दल नेमकी कुठे दाद मागायची, असा प्रश्न गावोगावी विचारला जात होता. त्यावर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून निवडून आलेलो आम्ही सात सदस्य हेच उत्तर व व्यासपीठ असल्याचे गेल्या दहा दिवसांतील माझ्या दौऱ्यात निदर्शनास आल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. पीएमआरडीएसाठी एक स्वतंत्र पीआरओ तसेच हद्दीतील प्रत्येक ग्रामपंचायतीशी प्रती महिन्याला एक बैठक घ्यावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे गव्हाणे यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in