Pune Crime : खंडणी उकळणाऱ्या तोतया पत्रकारांना अटक

Pune Crime news पैसे न दिल्यास संपूर्ण खानदान संपवून टाकतो" अशी धमकीच या तोतया पत्रकारांनी दिली होती.
Pune Crime news
Pune Crime news

Pune Crime पुणे : व्यावसायिकाला दमदाटी करत हत्या करण्याची धमकी देत काही तोतया पत्रकारांनी पाच लाख रुपयाची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. एका 42 वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तांवर यांच्यासह एका महिलेविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांचे केशवनगर येथे दुकान आहे. रविवारी (ता. 23) सायंकाळी 6 वाजता फिर्यादीच्या केशवनगरमधील दत्त कॉलनी येथील गोडाऊनमध्ये प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे, योगेश नागपुरे, लक्ष्मणसिंग तांवर हे आले.

Pune Crime news
..तर बॅगा भरायच्या आणि देश सोडून निघून जायचं; मनसेच्या मुस्लिमांना थेट इशारा

साळुंखे याने आपण एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिक व आत्मज्योती वृत्तपत्राचे पत्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर "गोडाऊनमध्ये भेसळयुक्त मालाची विक्री करून दोन नंबरचा धंदा करता, यापूर्वीही गुटखा विकून तुम्ही भरपूर पैसा कमाविला आहे.आता पेपरमध्ये तुमची बातमी लावून तुमची बदनामी करतो, तुम्हाला बरबाद करतो. पैसे न दिल्यास संपूर्ण खानदान संपवून टाकतो" अशी धमकी दिली.

त्यानंतर तक्रारदाराच्या मुलास मारहाण केली, तसेच त्यांच्या मुलाला व पत्नीला गोडाऊनमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर साळुंखे याने स्वतःसाठी, त्याच्या साथीदारांसाठी व आत्मज्योती या वृत्तपत्राच्या महिलेसाठी फिर्यादीकडून 5 लाख रुपयांची खंडणी उकळली. या घटनेनंतर फिर्यादी पोलिस ठाणे गाठून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in