फडणवीसांनी रुग्णालयात जाऊन घेतली लक्ष्मण जगतापांच्या प्रकृतीची माहिती

Devendra Fadnavis|Laxman Jagtap : फडणवीसांनी तब्येतीची विचारपूस केली असता त्यांना पाहून आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे.
 Laxman Jagtap .jpg
Laxman Jagtap .jpgSarkarnama

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (laxman-jagtap) यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज (ता.17 एप्रिल) रूग्णालयात जाऊन जगताप यांच्या तब्यतीची विचारपूस केली आहे.

 Laxman Jagtap .jpg
दोन्ही ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरचा अजित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला...

गेल्या काही दिवसापासून लक्ष्मण जगताप यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आज फडणवीसांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असता त्यांना पाहून आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती मिळाली आहे. जगतापांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी येतील, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

 Laxman Jagtap .jpg
अजित पवारांनी जपला भावनिक बंध; सर्व उद्घाटनं रद्द करत लक्ष्मण जगतापांच्या भेटीला

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना जगतापांच्या तब्येतीबाबत माहिती मिळताच त्यांनी काल (ता.16 एप्रिल) रुग्णालयात जाऊन जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन काल उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते केली जाणार होती. मात्र, आपले एकेकाळचे खंदे समर्थक व भाजपवासी झालेले जगतापांची प्रकृती नाजूक झाल्याची माहिती मिळताच पवारांनी शहरातील सर्व उद्घाटन कार्यक्रम अचानक रद्द केली आणि जगताप यांची भेट घेतली होती. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात विकास कामात जगतापांनी मोठी साथ दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com