फडणविसांनी बाजू सावरली; म्हणाले, राज्यपाल कोश्‍यारी अन् त्रिवेदींच्या वक्तव्याचा विपर्यास होतोय

Devendra Fadanvis : जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श राहतील, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama

Devendra Fadanvis news : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत. जोपर्यंत सूर्य, चंद्र तारे आहेत तोपर्यंत शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श राहतील. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. त्यावरून शनिवारपासून कोश्‍यारी यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन, निषेध मोर्चे सुरू आहेत. त्यात भर म्हणून दिल्लीतील भाजपा नेते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी केलेल्या वक्तव्याने आगीत तेल ओतल्याचे काम केले आहे.

Devendra Fadanvis
Congress : राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडून उद्या औरंगाबाद मार्गे सुरतला जाणार..

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryveer Savarkar) यांच्या संदर्भाने बोलताना त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले आहे. सावरकर यांनी पाठविलेले पत्र राजकारणाचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील पाचवेळा अशी पत्रे औरंगजेबाला पाठवली होती, असे विधान त्रिवेदी यांनी केले. त्रिवेदी यांच्या या विधानाने आधीच तापलेल्या वातावरणात आणखी भर पडली आहे. आज सकाळपासून विरोधकांनी हा विषय लावून धरला आहे.

Devendra Fadanvis
ठाकरेंची एक शाखा ताब्यात तर दुसरी जमीनदोस्त; राजकारण तापले

फडणवीस म्हणाले, " छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांच्या शौर्याची माहिती देशातील सर्वांना आहे. राज्यपालांनाही हा इतिहास माहिती आहे. त्यांच्या विधानाचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे."

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांची बाजू सावरली असली तरी त्रिवेदी व सुधांशू यांच्यामुळे महाराष्ट्र भाजपातील नेत्यांची मोठी अडचण झाली आहे. राज्यपाल आणि भाजपातील नेत्यांच्या वक्तव्यावर भाजपाचे नेते खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. राज्यातील भाजपा नेते माध्यमांसमोर बाजू सावरण्याचा प्रयत्न करीत असले तरी या साऱ्या प्रकारावरून या नेत्यांची चीड-चीड होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com