Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीलाही फडणवीसांचे टोले; म्हणाले...

By Election : कसबा आणि चिंचवडमधील पोटनिडणूक गांभीर्याने घेतल्याचे केले वक्तव्य
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

BJP vs NCP : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीतील मतदानाला आता काही दिवस बाकी राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी प्रचाराचा धुराळा उडत आहे. आपल्या उमेदवाराला मतदान होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीतील नेते आक्रमकपणे प्रचार करताना दिसत आहेत. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार (MVA) कोसल्यानंतर उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते भाजपवर दररोज टीका करतात. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निकालानंतर ठाकरे जास्तच आक्रमक झाले आहेत. ते दरररोज भाजपवर काही ना काही आरोप करताना दिसत आहेत.

त्याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, "उद्धवजींजवळ लिमिटेड शब्दकोश आहे. दहा-पंधरा शब्द ते फिरवून फिरवून बोलतात."

Devendra Fadnavis
SRA प्रकरणी किशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पोस्टर मुंबईत लावले होते. त्यावर पाटील यांचा 'भावी मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचेही राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले पोस्टर्स झळकले आहेत. यातून राष्ट्रवादीतून मुख्यमंत्रीपदासाठी चुरस असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Devendra Fadnavis
MPSC Students Protest : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; फडणवीसांनी दिलं 'हे' आश्वासन

राष्ट्रवादीत (NCP) मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या या शर्यतीबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला चिमटा घेतला आहे. फडणवीस म्हणाले, "पोस्टरवर भावी म्हटले आहे ना!त्यामुळं कधीतरी जेव्हा त्यांचं राज्य येईल तेव्हाच ना. त्यांचं राज्य येऊ शकत, असं काही नाही. कधीतरी त्यांचं राज्य आले तर मग ठरवतील कोण मुख्यमंत्री. त्याची लढाई आत्तापासून का करता?"

Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar : '' बॅनर लावून मुख्यमंत्री होता आले असते तर...''; सुधीर मुनगंटीवारांचा मिश्किल टोला

कोणीही प्रचाराला येऊद्या, पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकतील, असे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले होते. त्यावर फडणवीस यांना विचारले.

ते म्हणाले, "बाळासाहेब थोरात यांना तसंच म्हणावं लागेल. आम्ही पण असाच म्हणू की कोणी आलं तरी आमचाच उमेदवार निवडून येईल. कसबा, चिंचवडमध्ये भाजपची परिस्थिती चांगली आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. कोणतीही निवडणूक गांभीर्याने घ्यायची असते. आम्ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. आम्हाला लोकांचा आशीर्वाद मिळेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in