अण्णाभाऊंच्या तैलचित्र व पुतळा अनावरणासाठी फडणवीस,नार्वेकर रशियात; उद्या करणार अनावरण

Devendra Fadnavis : मॉस्कोतील भारतीय दुतावासातील अण्णाभाऊंच्या तैलचित्राचे अनावरण फडणवीस करणार आहेत.
Devendra Fadnavis & Rahul Narwekar Latest News
Devendra Fadnavis & Rahul Narwekar Latest NewsSarkarnama

पिंपरी : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याला सलामी म्हणून त्यांचा अर्धाकृती पुतळा रशियाची (Russia) राजधानी मॉस्को येथील Maragarita Rodomino All Russia State Library for Foreign Literature या जगप्रसिद्ध ग्रंथालयाने आपल्या प्रांगणात शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींसोबत उभारला आहे. त्याचे अनावरण हे उद्या (ता.१४ सप्टेंबर ) सकाळी ११ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी ते आणि विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर हे आज मॉस्कोत दाखल झाले. (Devendra Fadnavis & Rahul Narwekar Latest News)

Devendra Fadnavis & Rahul Narwekar Latest News
ठाणे तालुक्यातील 'या' १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश...

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे आणि अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व पिंपरी-चिंचवडकर अमित गोरखे हे ही फडणवीसांबरोबर मॉस्कोला गेले आहेत. गोरखे यांनीच अण्णाभाऊंचा अर्धाकृती पुतळा उभारल्याबद्दल मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या संस्थेचे अभिनंदन राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात करण्याची मागणी फडणवीसांकडे गेल्या महिन्यात १७ तारखेला पत्राव्दारे केली होती.

मॉस्कोत अण्णाभाऊंचा अर्धपुतळा म्हणजे भारत महाराष्ट्रासह देशाचा मोठा गौरव असून महाराष्ट्राची शान असल्याने तो उभारलेल्या संस्थेचा गौरव करावा असे त्यात म्हटले होते. आपल्या लाडक्या पदाधिकाऱ्याची मागणी फडणवीसांनी लगेच मंजूर करीत सदर संस्थेच्या अभिनंदनाचा ठराव राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केला होता. रशियात अण्णाभाऊंचा अर्धाकृती पुतळा बसविणे ही बाब महाराष्ट्रासह देशाचा मान व शान वाढणारी आहे, असे त्यात म्हटले आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे, यासाठी आता गोरखेंचे आपल्या परीने प्रयत्न सुरु झाले आहेत.

Devendra Fadnavis & Rahul Narwekar Latest News
अमृता फडणवीसांना फेसबुकवर शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक; 'आयपी अ‍ॅड्रेस' तपासल्यावर...

उद्या सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दुतावासातील अण्णाभाऊंच्या तैलचित्राचे अनावरण फडणवीस करणार आहेत. तत्पूर्वी आज सायंकाळी रशियातील भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, भारत-रशिया संबंधांची ७५ वर्षे तसेच अण्णाभाऊंचे रशियातील वास्तव्य आणि त्यांच्या साहित्याचा रशियात असलेला प्रभाव, असे सर्व योग साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याशिवाय काही उद्योजक आणि कंपन्यांसोबत सुद्धा महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने या दौर्‍यात भेटीगाठी होणार आहेत. यापूर्वी लंडनमधील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, जपानमधील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब यांचा पुतळा अशा कार्यक्रमांसाठी सुद्धा फडणवीस हे त्या-त्या देशांमध्ये गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com