Devendra Fadnavis : फडणवीसांचा पलटवार; विरोधकांकडून महाराष्ट्राची जास्त बदनामी

Maharashtra Politics : "...मग कामाख्या देवी महाराष्ट्रात येईल का?"
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

Bhimashankar News : आसामचे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पुणे जिल्ह्यात असलेले सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकरवर दावा सांगितला आहे. त्यांनी वृत्तपत्रांना दिलेल्या जाहिरातीत भीमाशंकर हे आसामचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी विरोधकांना टोले लगावत पलटवार केला.

आसामचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकरवर दावा सांगत आहे. त्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठविली. त्याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाच्या माध्यमातून विरोधक राज्याची बदनामी करीत असल्याचा आरोप केला. त्यांच्याकडे टीका करण्यासाठी दुसरे विषय उरले नसल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.

Devendra Fadnavis
NDCC Bank News; दादा भुसेंनी उलटवली प्रशासक कदमांची ‘चाल’

फडणवीस म्हणाले, "कुणीही भीमाशंकरवर (Bhimashankar) दावा ते आसामचे होत नसते. मात्र तसे बोलणारेच महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत. महाराष्ट्रावर त्यांचा विश्वास नाही. जाहिरातीने झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा येथील विरोधकांनी केली. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे. भीमाशंकरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे."

Devendra Fadnavis
Fadnavis vs Raut : राऊतांचे आरोप चुकीचे, सनसनाटी निर्माण करण्यासाठी; फडणवीस स्पष्टच बोलले

यानंतर फडणवीस म्हणाले, "भीमाशंकर महाराष्ट्रात आहे, त्याबाबत शंका येण्याचे कारण नाही. उद्या मी जाहिरात दिली, त्यात कामाख्या मंदीर (Kamakya Temple) महाराष्ट्रात आहे, असे म्हटले तर ते मंदीर महाराष्ट्रात येणार आहे का? ते आहे तेथेच राहणार आहे." यानंतर कुणीही कितीही दावा केला तरी भीमाशंकर महाराष्ट्रातच राहणार आहे. विरोधकांना आता मुद्दे राहिले नसल्याने या विषयावर सतत बोलत असल्याचा टोला फडणवीस लगावला.

Devendra Fadnavis
Patan : शंभूराज देसाईंच्या मेळाव्यात 273 जणांना मिळाली नोकरी....

याबाबत विरोधकांनी भाजपवर (BJP) सर्व बाजूंनी टीका केली. भाजपला महाराष्ट्रातून भीमाशंकर हिरावून घ्यायचे आहे. भाजपला महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचे नाही. उद्योग नेले, रोजगार नेले आता सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसाही पळविण्याचा घाट त्यांनी घातला आहे, असे आरोप विरोधकांनी केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com