शरद बुट्टे पाटलांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' फडणवीसांनी स्विकारला...

Devendra Fadnavis : बुट्टे पाटलांनी आपल्या महाराष्ट्र पंचायत परिषद च्या सादरीकरणात मांडले आहेत.
Sharad Butte, Devendra Fadnavis Latest News
Sharad Butte, Devendra Fadnavis Latest NewsSarkarnama

शिक्रापूर : प्रत्येक राज्य सरकारकडून ग्रामविकास पेक्षा नगरविकास खात्यालाच झुकते माप देण्यातील नेमकी मेख पकडून आणि ग्रामपंचायत-पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या उत्तम समन्वयाने राज्यातील सुमारे २८ हजार गावांचा समतोल विकास साधण्यासाठीची अनोखी क्लूप्ती पुणे जिल्हा परिषदेतील भाजपा गटनेते शरद बुट्टे-पाटील यांनी शोधली आहे.

'महाराष्ट्र पंचायत परिषद' या अभिनव कल्पनेचा आराखडा करुन त्याचे सादरीकरण पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुट्टे पाटलांच्या संपूर्ण प्रकल्पाची तात्काळ कार्यवाही करण्याच्या नुकत्याच सुचना दिल्या. (Sharad Butte, Devendra Fadnavis Latest News)

Sharad Butte, Devendra Fadnavis Latest News
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर खासदार श्रीकांत शिंदेंचं भावनिक पत्र; म्हणाले...

राज्यात एकुण सुमारे २८ हजार ग्रामपंचयाती, ३३ जिल्हा परिषदा व ३५१ एवढ्या पंचायत समित्या यांचे निमित्ताने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था कार्यरत आहे. वस्तुत: ग्रामविकास मंत्री ते थेट जिल्हा परिषद आणि इतर दोन्ही पंचायत राज्य व्यवस्था संस्था अशा क्रमाने कार्यरत सध्याची व्यवस्था अत्यंत गतीमान करायची असेल व सरकारी धोरणांची यथायोग्य व १०० टक्के अंमलबजावणी राज्यातील सुमारे २८ हजार गावांपर्यंत पोहचवून अभिप्रेत परिणाम साधायचे असतील तर या त्रिस्तरीय व्यवस्थेत काही बदल बुट्टे पाटलांनी आपल्या महाराष्ट्र पंचायत परिषद च्या सादरीकरणात मांडले आहेत.

Sharad Butte, Devendra Fadnavis Latest News
मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावर नारायण राणेंची छाप!

दरम्यान वरील विषयाचे संपूर्ण सादरीकरण नुकतेच बुट्टे पाटील यांनी फडणवीसांकडे सादर केले असून या संपूर्ण प्रकल्पाच्या माहितीची तपासून तात्काळ कार्यवाहीची सुचना त्यांनी ग्रामविकास खात्यासह इतर आवश्यक त्या खात्यांकडे वर्ग केल्याचे शेरेही निवेदनावर लिहील्याची माहिती बुट्टे पाटीलांनी दिली.

प्रस्तावित ’महाराष्ट्र पंचायत परिषद’ची अशी आहे रचना

  • परिषदेचे अध्यक्ष : ग्रामविकास मंत्री

  • सहअध्यक्ष : ग्रामविकास राज्यमंत्री

  • उपाध्यक्ष : ग्रामिण विकासासाठी पूर्णवेळ काम करणारी समर्पित व्यक्ती

  • सचिव : ग्रामविकास सचिव

  • एकुण सदस्य : १७

त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणे : दोन जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, प्रत्येक महसूली विभागातून एक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व एक पंचायत समिती सदस्य, प्रत्येक विभागातून एक विद्यमान सरपंच, एक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, एक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचयात), ग्रामविकास क्षेत्रातील चार मान्यवर व्यक्ती व ग्रामविकास क्षेत्रातील दोन स्वयंसेवी संस्था सदस्य.

अशी आहे महाराष्ट्र पंचायत परिषदेची अष्टसुत्री

शासनाच्या सर्व योजना प्रभावी जनतेपर्यंत पोहचविणे, माणवी व शाश्वत विकास दिशादर्शन, शासन व त्रिस्तरीय संस्थांशी समन्वय, लोकप्रतिनिधी प्रशिक्षण समन्वय, ग्रामिण विकासात योगदान देणा-या व्यक्तिंसाठी प्रभावी व्यासपिठ, शासन निर्णय व योजना यांची प्रभावी अंमलबजावणी, त्रिस्तरीय संस्थाचा सततचा शासन समन्व्यय, ७३ व्या घटनादुरुस्तीनंतरचा देशातील ऐतिहासिक सर्वात मोठा निर्णय म्हणून प्रभावी अंमबलजावणी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com