२० कोटींचे नुकसान होवू द्यायचे नसेल तर एक कोटी द्या; मारणे टोळीच्या नावाने पुन्हा दहशत

Pune Crime News : बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी
Pune Crime News
Pune Crime Newssarkarnama

पुणे : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारणे टोळीची भिती दाखवून जीवे मारण्याची धमकी देत सराईत गुन्हेगाराने खंडणीची मागणी केल्याची घडना समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

राकेश विठ्ठल मारणे असे गुन्हा दाखल झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवार पेठेतील एका ४७ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. ही घटना २६ जून ते नोव्हेंबर २०२२ या कालावधी सॅलिसबरी पार्क परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सॅलिसबरी पार्क परिसरात एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. आरोपी राकेश मारणे हा तेथे गेला होता. त्याने फिर्यादींच्या बांधकाम प्रकल्पाचे काम बंद पाडण्यास भाग पाडून तेथील चार मजले अनधिकृत असल्याचे सांगितले. ते पाडल्यास २० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भिती दाखवली.

Pune Crime News
उध्दव ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांचा सणसणीत पलटवार; म्हणाले,काहींना जनाचीही नाही आणि...

२० कोटी रुपयांचे नुकसान करून घ्यायचे नसेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगत त्याने १ कोटी रुपयांची खंडणी मागितली. एक कोटी रुपये दिले नाही तर तुमच्या इमारतीच्या संदर्भात महापालिका व इतर विभागात खोटे तक्रारी अर्ज करून त्रास देण्याबरोबरच मारणे टोळीची भिती दाखवून जीवे मारण्याची धमकीही राकेश मारणे याने दिली.

Pune Crime News
बोम्मईंचा सोलापूरवर दावा; आंदोलन करत, दौंड-कर्नाटकच्या बसला काळे फासणाऱ्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, मारणे याच्याकडून सतत होणारा त्रास व धमक्यांना कंटाळून बांधकाम व्यावसायिकाने गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेत तक्रार केली होती. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"राकेश मारणे याने बांधकाम व्यावसायिकाला मारणे टोळीची भिती दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तो एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता व आरटीआय (RTI) कार्यकर्ता असल्याची देखील फिर्यादींना सांगत धमकावले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे, असं खंडणी विरोधी पथक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com