Pune NCP : राष्ट्रवादीच्या विरोधात जाणं भोवलं; विकास दांगट यांची पक्षातून हाकालपट्टी

NCP News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी
Vikas Dangat Patil
Vikas Dangat Patil Sarkarnama

प्रवीण डोके :

Pune News : राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातच पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (हवेली) पंचवार्षिक निवडणुकीत पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली आहे.

विकास दांगट यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती गारटकर यांनी दिली.

Vikas Dangat Patil
Devendra Fadnavis News: 'देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री'; नागपूरमध्ये झळकले बॅनर, चर्चांना उधाण

''हवेली तालुक्यात ग्रामपंचायत व सोसायटी विभागात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी अत्यंत सोपी होती. मात्र, असे असतानाही त्यांच्याकडे पक्षाच्या पॅनलबाबत सातत्याने विचारणा करत असताना त्यांनी पक्षाला सोडून का निर्णय घेतला. याचा विचार केला असता, त्यांची भाजपशी जवळीक झाल्याचे लक्षात आले'', असं गारटकर यांनी सांगितले.

''अजित पवार यांनी मला राष्ट्रवादीचा अधिकृत पॅनल उभा करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मी अनेकवेळा दांगट यांच्याशी पॅनल करण्याविषयी चर्चा केली. मात्र, त्यांनी कायम भाजपच्या काही उमेदवारांसाठी आणि मागील संचालक मंडळात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला, त्यांच्यासाठी ते आग्रही राहिले'', असंही गारटकर म्हणाले.

Vikas Dangat Patil
Raju Shetty on Barsu Refinery : सुपारी घेऊन जमिनी हाडपण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांना महागात पडेल...राजू शेट्टी

''एक वर्षापूर्वी झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के आणि दांगट यांची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. दोघे राष्ट्रवादीचे पण त्यांच्यात एकमत होत नव्हते. त्यामुळे शेवटच्या क्षणी नाईलाजास्तव हा निर्णय पक्षाला घ्यावा लागला होता. त्या निवडणुकीत पक्षाच्या अनेक मान्यवरांनी दांगट यांचे उघडपणे काम केले होते. त्यामुळेच ते विजयी झाले होते, याची जाणीव दांगट यांनी ठेवली नाही'', असंही ते म्हणाले.

Vikas Dangat Patil
Karnatak Assembly Election 2023 : विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; सर्वच पक्षांसमोर बंडखोरीचे आव्हान

पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाई :

मागील दोन महिने अजितदादांविषयी चुकीच्या बातम्या पेरत सर्वांची दिशाभूल करण्याचे काम दांगट यांनी केले, असा आरोप गारटकर यांनी केला.

तसेच पक्षविरोधी कारवायांबाबत विकास दांगट यांची पक्षातून हाकालपट्टी करीत आहे. हवेली तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे पक्षविरोधी भूमिका घेऊन काम करत आहेत. त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबवाव्यात, अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, शरद पवार यांच्या जिल्ह्यात पक्षाच्या अधिकृत पॅनल विरोधात जाऊन पक्षालाच आव्हान देण्याची भूमिका चुकीची आहे. पक्षाची शिस्त सर्वांसाठी बंधनकारक आहे, असं गारटकर म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com