जिल्हा रुग्णालयात खळबळ; सिव्हिल सर्जनसह तिघेजण ACB च्या जाळ्यात

ACB|Crime News : शिक्रापूरच्या सोनोग्राफी सेंटरमधील २५ वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
ACB trapp Latest News
ACB trapp Latest NewsSarkarnama

पिंपरी : पुणे जिल्हा (औंध) रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि सहाय्यक अधिक्षक अशा तिघांना लाच (Bribe) घेताना बुधवार (ता.६ जुलै) पकडण्यात आले. यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथील एका सोनोग्राफी केंद्रांच्या प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी चाळीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील १२ हजार सहाय्यक अधिक्षकामार्फत घेण्यात आले. या तिघांनाही येत्या शनिवारपर्यंत (ता.९ जुलै) दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश पुणे येथील विशेष न्यायाधीश हेडावू यांनी (ता.७) दिला (ACB trapp Latest Marathi News)

ACB trapp Latest News
पुणे महापालिकेत खळबळ; उपायुक्तांसह पत्नी ACB च्या जाळ्यात

महादेव बाजीराव गिरी (वय ५२, प्रशासकीय अधिकारी), डॉ. माधव बापूराव कनकवळे (वय ५०, जिल्हा शल्य चिकित्सक) आणि संजय सीताराम कडाळे (वय ४५, सहाय्यक अधिक्षक) अशी आऱोपींची नावे आहेत. औंध रुग्णालय आवारातच ही लाच घेण्यात आली. त्याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये याच पोलिस ठाण्यात लाचखोरीचे अधिक गुन्हे दाखल होत आहेत. यापूर्वी याच पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याला पोलिस ठाण्यातच लाच घेताना पकडण्यात आले होते.

ACB trapp Latest News
शिंजो आबेंवर जीवघेणा हल्ला कसा झाला? तीन व्हिडीओत कैद झाली घटना

याबाबत शिक्रापूरच्या सोनोग्राफी सेंटरमधील २५ वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याबाबत खातरजमा केल्यानंतर काल सापळा लावण्यात आला. त्यात कडाळे हा लाच घेताना पकडण्यात आला. त्याने गिरी व डॉ. कनकवळे यांच्या मागणी व सांगण्यानुसार ती घेतल्याचे समजताच त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सोनोग्राफी सेंटरच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण हे एका कमिटीमार्फत केले जाते. त्यामुळे या गुन्ह्यात आणखी काहींचा सहभाग आहे का याची खातरजमा करण्यासाठी पोलिस कोठडी गरजेची असल्याचा युक्तिवाद सहाय्यक सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in