पुण्यात पालिकेच्या कृपेने जूनमध्येदेखील सुरू आहे रस्ते खोदाई; आप आक्रमक

प्रशासन आणि ठेकेदारांना या दिरंगाईबद्दल जबाबदार ठरवत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
Aap-pune
Aap-puneSarkarnama

पुणे : पुणे महापालिका प्रशासनाच्या (Pune Municipal Corporetion) ढिसाळ आणि ठेकेदारप्रेमी कारभारामुळे शहर आणि उपनगरांत जून महिन्यातील पहिला आठवडा उलटला तरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे, असा आरोप आम आदमी पार्टीच्यावतीने (Aam aadmi Party) करण्यात आला आहे.

Aap-pune
भाजप आता ताकही फुंकून पिणार! नेत्यांसाठी आखली लक्ष्मणरेषा

विशेषतः शहरातील मध्यवर्ती लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यासह सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार या भागातील अरुंद रस्त्यांवर खोदकामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मल:निस्सारण, समान पाणीपुरवठा यामुळे सुरू असलेल्या रस्त्यांचे खोदकाम १५ मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु जून अखेर पर्यंत देखील ही कामे पूर्ण होतील का याबद्दल शंका आहे.

Aap-pune
समाजवादी पक्षानं वाढवलं शिवसेनेचं टेन्शन! अखिलेश यादवच आता निर्णय घेणार

प्रशासन आणि ठेकेदारांना या दिरंगाईबद्दल जबाबदार ठरवत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कामांच्या दरम्यान जर काही जीवितहानी झाली तर त्यासाठी सर्वस्वी पालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी आपच्यावतीने करण्यात आली आहे.

वर्षातील बाराही महिने पुणे शहरात सातत्याने रस्त्यांची कामे सुरूच असतात. कधीही न संपणाऱ्या या रस्ते खोदकामांमुळे पुणेकर अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. जर यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्यास आम आदमी पक्ष संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आप राज्य संघटक तथा पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com