राष्ट्रवादीचे राज्यमंत्री म्हणतात, मी फडणवीसांच्या ऋणात राहू इच्छितो!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही त्यांनी मला खूप मदत केली : दत्तात्रेय भरणे
Dattatray bharane
Dattatray bharaneSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : विधानसभेच्या २००९, २०१४ च्या निवडणुकीत मी खूप फिरलो; पण २०१९ च्या निवडणुकीत मी खूप कमी फिरलो. कोणत्याही वाड्या-वस्त्यांवर मला मतदान द्या म्हणून मी सांगायला गेलो नाही. पण, २०१४ ते २०१९ मध्ये इंदापूर तालुक्यातील वाडीवस्तीवर गेलो. प्रत्येकांच्या सुख-दु:खात सहभागी झालो. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) मला मदत करतात. त्या काळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील मला मदत केली, त्यामुळे मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray bharane) यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले. (Even when Devendra Fadnavis was the Chief Minister, he helped me a lot : Dattatray bharane)

अजित देविदास ढवळे-पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी (ता. २० नोव्हेंबर) इंदापूर सरस्वतीनगर येथे शिल्प व स्वागत कमान लोकार्पण सोहळा, हृदयरोग, आरोग्य शिबिराचे उदघाटन राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Dattatray bharane
भीमा-पाटस अखेर भाड्याने चालवायला देणार : पण घेणार कोण याकडे लक्ष!

मंत्री भरणे म्हणाले, मागील वीस वर्षांपूर्वी इंदापूरचा विकास व आता माझ्या कारकिर्दीत होत असलेला विकास पाहा. इंदापूर शहर विकासासाठी कोणतेही राजकारण न आणता आपण ४० कोटी रुपयांचा निधी दिला. काही मंडळी येतात, त्यांचा काहीही संबंध नसताना हाॅलचे उदघाटन करतात. ज्या योजनेतून ते मंजूर झाले आहे, त्या योजनेचा आमदार म्हणून मी सदस्य आहे. लोकांनी तुम्हाला रामराम केला आहे, शांत राहण्यासाठी विश्रांती दिली आहे. मात्र, त्यांना ते समजतच नाही, असा टोला भरणे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना नाव न घेता लगावला.

हिंदू असो किंवा मुस्लिम असो, शेवटी रक्त एकच आहे. आज जे दंगे चालले आहेत, त्यापाठीमागे खूप मोठे षडयंत्र आहे. विशिष्ट आडनाव आहे; म्हणून मुंबईत त्याला लक्ष्य केले जाते. त्यामुळे ज्याच्या रक्तातच मुस्लिमांबद्दल विष आहे, अशा भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला आपण जाब विचारला पाहिजे, असेही आवाहनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, सचिन सपकळ, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, सागर मिसाळ, प्रा.अशोक मखरे, दिलीप वाघमारे, श्रीधर बाब्रस, सचिन खामगळ, निखिल बाब्रस, गफूर सय्यद, सुरेश गवळी, राजश्री मखरे, मधुरा ढवळे-पवार, स्मिता पवार, सुभाष ढरंगे, डाॅ. एकनाथ चंदनशिवे, डाॅ. सुहास शेळके उपस्थित होते. (कै.) अजित देविदास ढवळे-पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे-पवार यांनी सुत्रसंचलन केले. ॲड आशुतोष भोसले यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in